Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर..

Breaking Marathi News Live Update : आजच्या ताज्या बातम्यांचे Live Updates जाणून घ्या. महाराष्ट्र, पुणे मुंबईसह देश विदेशातील राजकारण, हवामान, क्रीडा, मनोरंजन आणि महत्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट.
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

मुंबईत FDA ची मोठी कारवाई, डोमिनोजच्या तीन आउटलेटचे लायसन्स रद्द

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत डोमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड्ससह १०४ मोठ्या आऊटलेटची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अस्वच्छता, किड्यांचा प्रादुर्भाव आणि नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन आढळून आल्याने डोमिनोजच्या विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील तीन शाखांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. या तीन केंद्रांमध्ये स्वच्छतेसंदर्भातील गंभीर त्रुटी आढळल्या. तसेच, नियमांचे सुमारे ५४ टक्क्यांपर्यंत उल्लंघन झाल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने संबंधित केंद्रांवर तातडीची कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com