Gadakh's election in Sonai, Murkute's Devgaon
Gadakh's election in Sonai, Murkute's Devgaon 
अहमदनगर

मंत्री गडाखांची सोनई, माजी आमदार मुरकुटेंच्या देवगावची "बिनविरोध'ला हूल 

सुनील गर्जे

नेवासे : तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्‍याच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या गावांसह एकूण 53 गावांत निवडणुकीचा फड रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

नेवासे तालुक्‍यात युवा नेते प्रशांत गडाख यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने विकासासाठी घेतलेले दत्तक गाव मोरया चिंचोरेसह शनिशिंगणापूर, देवसडे, खरवंडी, मंगळापूर, वाटापूर या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. विशेष म्हणजे, बिनविरोध निवड झालेल्या बहुतांश ग्रामपंचायतींवर जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व आहे. 

दरम्यान, गडाख यांच्या सोनईत एकूण 17 जागांसाठी 42, तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या देवगाव येथे 13 जागांसाठी 29 उमेदवार उभे असून, या गावांसह एकूण 53 गावांत निवडणुकांचा फड रंगणार आहे. 

अर्जमाघारीची मुदत संपल्यानंतर आज सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची, तसेच 591पैकी सुमारे 109 सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती नेवासे निवडणूक विभागाकडून देण्यात आली. अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: कन्हैय्या कुमार यांचा धर्मांतर करा असे सांगणारा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल, वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT