Gambling with the witness of Bhairavnath in Gadilgaon 
अहिल्यानगर

गाडिलगावात भैरवनाथाच्या साक्षीने चालू होता जुगार... शेवटी देव कोपलाच

मार्तंड बुचुडे

पारनेर ः पूर्वी किमान मंदिरात जाताना शुद्ध अंतकरणाने प्रवेश केला जायचा. मंदिरात किंवा त्याच्या परिसरातही कुकर्म करण्यास लोक धजावत नसाचयचे. कोणी तसे दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर भाविक त्या नाठाळाच्या माथी काठी हाणायचे. आता मात्र मंदिरांतील देवाच्या साक्षीनेच जुगारअड्डा चालवला जातो. मदिरापानही केले जाते. मुखयज्ञ करतानाही कोणालाच शुभाशुभ वाटत नाही. याचा प्रत्यय पारनेर तालुक्यात आला. शेवटी देव कोपलाच.

गाडिलगाव येथे भैरवनाथ मंदिराच्या आडोशाला विनापरवाना बेकायदा तिरट नावाचा जुगार खेळताना पाच जणांना पोलीसांनी रंगेहात पकडले.

त्या पाच जणांसह त्यांच्याकडून रोख रक्कम 11 हजार 860 रुपये व जुगार खेळण्याचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघऩ केल्याचा व अवैध विनापरवाना जुगर खेळल्याचा पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत माहिती अशी काल (ता. 12 ) सायंकाळी गाडिलगाव येथील भैरवनाथ मंदीराच्या भिंतीच्या अडोशाला संदीप गाडीलकर (वय 45 ) सुभाष गाडीलकर ( वय 39 ) प्रशांत गाडीलकर (वय 33 ) , संतोष खोसे (वय 41 ) बाळू उर्फ बाळासाहेब सोनवणे (वय 40 ) सर्व रा. गाडीलगाव हे तिरट नावाचा जुगार खेळताना पारनेर पोलीसांना अढळून आले.

त्यांच्याकडून पोलिसांनी तिरट खेळण्याचे साहित्य व 11 हजार 860 रूपये रोख ताब्यात घेतले आहेत. या पाच जणांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला अाहे. 

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शना खाली पारनेर पोलीस करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT