ganeshotsav sakal
अहिल्यानगर

Ganeshotsav : मुस्लिम कारागिरांनी साकारले श्री विशाल गणेश मंदिर

सामाजिक समरसता हैदराबाद, जयपूरमध्येही बिर्ला मंदिरांची उभारणी

अशोक निंबाळकर

अहमदनगर - श्री विशाल गणेश मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिम कारागीर गेल्या दीड तपापासून घाम गाळत आहेत. शनिमंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गोगादेव मंदिरांसोबत राजस्थानमधील या कारागिरांनी बिर्लांच्या लक्ष्मी-नारायण मंदिराची उभारणी केली. हैदराबादेतही श्री बालाजीचे मंदिर त्यांच्या कलेतून साकारलेय. धार्मिक वातावरण गढूळ झालेल्या काळात ही सामाजिक समरसता सुखावणारी आहे.

माळीवाड्यातील श्री विशाल गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या अठरा वर्षांपासून हे काम सुरू आहे. त्यासाठी राजस्थानातील मुस्लिम कारागीर जीव तोडून मेहनत घेत आहेत. मुख्य कारागीर खालिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची उभारणी होत आहे.

शेख यांनी यापूर्वी अनेक प्रसिद्ध मंदिरांची उभारणी केली. एका मंदिरासाठी त्यांना किमान आठ ते दहा वर्षे लागतात.

विशाल गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारास अठरा वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. आतापर्यंत अठरा कोटी रुपये खर्च झाला. आणखी साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर सांगतात.

हे देवस्थान क वर्गात मोडते. मंदिराचा गाभारा पूर्ण झालाय. सभामंडपाचेही काम पूर्णत्वास गेलेय. कळस, भिंतींचेही काम झाले आहे. ७५ ते ८० टक्के काम झाले आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर वरच्या बाजूच्या मंडपाचे काम बाकी आहे. पुजारी बसतात, त्या जागेवरील काम राहिले आहे. राजस्थानातील या मुस्लिम धर्मीय कारागिरांनी आतापर्यंत मशीद, दर्ग्यापेक्षा जास्त मंदिरेच उभारली आहेत.

विघ्नहर्त्याच्या मंदिराला निधीचे विघ्न

श्री विशाल गणेश देवस्थानला दानपेटीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. हा गणपती नवसाला पावणारा आहे. त्यामुळे काही भाविक देणगी देतात. बहुतांशी काम क्रेडिटवर सुरू आहे. कारागिरांना राहण्यासाठी अॅड. अभय आगरकर यांनी स्वतःची जागा विनामूल्य दिली आहे. आस्थापनेवरही देवस्थानचा मोठा खर्च होतो. नगरकरांचा हा लाडका बाप्पा आहे. सर्वच राजकीय नेते त्याच्या चरणी नतमस्तक होतात. मात्र, दुर्दैवाने मंदिरासाठी कोणीही हात रिता करीत नाही. कोविड काळात उत्पन्नाचे स्रोत आटल्याने काम आणखीच लांबले.

कामाचा लेखाजोखा

कालावधी - १८ वर्षे

खर्च - १८ कोटी

उर्वरित खर्च - ४ कोटी

मंदिराचा प्रकार - मार्बल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

SCROLL FOR NEXT