Ghodegaon cattle market will resume from Friday 
अहिल्यानगर

घोडेगावचा जनावरांचा बाजार शुक्रवारपासून पुन्हा फुलणार

विनायक दरंदले

सोनई: राज्यात प्रसिद्ध असलेला घोडेगाव (ता.नेवासे) येथील जनावरांचा बाजार सहा महिन्याच्या विश्रांतीनंतर शुक्रवार (ता.२३) पासुन सुरु होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डिले व सचिव देवदत्त पालवे यांनी दिली.

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून २० मार्च २०२० रोजी घोडेगाव येथील उपबाजारात भरणारा जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता. येथे
राज्यासह परराज्यातून व्यापारी व शेतकरी शेळी, मेंढी, गाय, बैल व म्हशी घेण्यासाठी येत होते. बाजारात दर शुक्रवारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याने गाव व परीसरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला होता. शेतक-यांनाही या बंदमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले.

जनावरांचा बाजार बंद झाल्यानंतर म्हैस व्यापा-यांनी ऑनलाईन म्हैस विक्रीचा नवा फंडा पुढे आणत खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. शेतकरी, ग्राहक व व्यापारी असा व्हाॅटसअप ग्रुप करुन त्यावर म्हशीचे फोटो, व्हिडिओ व किंमत टाकली जात होती. पसंती झाल्यानंतर व्यापारी पुढील ग्राहकास मोबाईलवर
व्हिडिओ काॅल करुन म्हशीला चालवून दाखवत होते. येथील पसंती झाल्यानंतर फोन-पे अथवा गुगल-पेनुसार खरेदी होत होती.

तीन दिवसाने जनावरांचा बाजार सुरु होणार असला तरी बाजार समितीच्या वतीने कोरोना संसर्गाची पुर्ण काळजी घेतली जाणार आहे.बाजाराच्या प्रवेशद्वारात सॅनेटायझर ठेवले जाणार आहे.मास्क असणा-यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेणार आहे. असे सचिव पालवे यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT