IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Shreyas Iyer on Opening Combination Dilemma for 1st T20I: अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा असे सलामीसाठी पर्याय आहेत. याबाबत पहिल्या टी२० सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने भाष्य केले आहे.
India vs Afghanistan T20I Series

Abhishek Sharma | Vaibhav Sooryavanshi | Sanju Samson | Shreyas Iyer

Sakal

Updated on

India vs Afghanistan T20I Marathi News: भारत आणि अफगाणिस्तान संघात रविवारपासून (१३ सप्टेंबर) टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेसाठी भारताचा टी२० कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.

यावेळी त्याने दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंबद्दल आणि सलामीवीरांच्या निवडीसाठी होणाऱ्या डोकेदुखीबाबतही भाष्य केले.

India vs Afghanistan T20I Series
IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com