Goat Birthday
Goat Birthday 
अहमदनगर

Goat Birthday : बड्डे आहे बोकडाचा! गळ्यात चैन अन् पायात चाळ; केक कापून वाढदिवस तोऱ्यात साजरा

सकाळ डिजिटल टीम

राशीन : आजकाल सर्वत्र वाढदिवसांचे अक्षरशः पेव फुटले आहे. वाढदिवस साजरा करणार नाही तो कसला आलाय तरुण! तरुणाईवर वाढदिवसाचे मोठे गारुड आहे. नेत्याचा, मित्राचा, नातेवाइकाचा, कार्यकर्त्याचा, असे कैकांचे वाढदिवस मोठ्या थाटात, लाखो रुपयांचा चुराडा करून साजरे केले जातात. मात्र, चिलवडी (ता. कर्जत) येथील माय-लेकराने चक्क अडीच लाख रुपये किमतीच्या बोकडाचा वाढदिवस केक कापून, तोफा वाजवून आणि स्नेहीजनांना भोजन देऊन साजरा केला.

त्याचे झाले असे, पदवीनंतर पुण्यात राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या तुषार संभाजी लोंढे या तरुणाने कोरोनाच्या संकटात पुण्याला राम राम ठोकला अन्‌ चिलवडीत आपल्या शेतीत आई जयश्री लोंढे यांच्या मदतीने शेळीपालन सुरू केले. शेळीपालनातले बारकावे आणि समस्या समजून घेऊन या माय-लेकरांनी पावणेदोन एकरांत चाऱ्यासह बीटल जातीच्या शेळ्यांचे बंदिस्त शेलीपालन सुरू केले.

शेळ्यांसाठी तुती, शेवरी, लळही, हादगा, शेवगा, उंबर, स्मार्ट नेपिअर गवत, मेथी घास आदींची लागवड केली आहे. हिरव्यागार मळ्याच्या कडेला हे शेळीपालन आज यशस्वी ठरले आहे. त्यामागे माय-लेकाचे अथक परिश्रम आहेत. आज त्यांच्याकडे साठ शेळ्या आणि बोकड आहेत. ही सर्व जनावरे त्यांनी जिवापाड जपली आहेत.

या शेळ्यांच्या कळपात गेल्या वर्षी जन्मलेल्या कोहिनूर नावाच्या बोकडाचा तुषार आणि जयश्री या मायलेकरांनी वाढदिवस साजरा केला. कोहिनूरच्या गळ्यात चेन, पायात चाळ, आणि रंगीत गोंडे घालून स्नेहीजनांच्या उपस्थितीत ‘हॅप्पी बर्थ डे’ म्हणत केक कापून, त्यास केक भरवून हा आगळा-वेगळा वाढदिवस साजरा झाला.

अडीच लाख रुपये किमतीचा, एक क्विंटल वजनाचा बीटल जातीचा हा छातीइतका उंच असलेला कोहिनूर बोकड आहे. त्याला बेण्यासाठी मोठी मागणी आहे. तुषार आणि जयश्री लोंढे ही माय-लेकरे वर्षाला या शेळीपालनातून सुमारे बारा लाखांचे उत्पन्न मिळवीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT