Goat thieves shoot at two farmers
Goat thieves shoot at two farmers 
अहमदनगर

कर्जतमध्ये शेळीचोरांनी केला दोन शेतकऱ्यांवर गोळीबार

नीलेश दिवटे

कर्जत : तालुक्यातील निंबोडी या गावांमध्ये चोरट्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये खंडू गरड (वय ५०) वर्ष व भरत बर्डे (वय ३५ ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. बापूराव गरड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

दरम्यान जिल्हा पोलिसप्रमुख पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. गोळीबाराचा प्रथमच प्रकार घडल्याने ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कर्जत-जामखेड मार्गालगत दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबोडी या गावामध्ये काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास  तिघे चोरटे आले होते. त्यांनी प्रदीप गरड यांची शेळी चोरून घेऊन जात असताना प्रदीप गरड जागे झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर इतर नातेवाईकही जागे झाले. त्यावेळी तीन चोरट्यांनी शेळी घेऊन धूम ठोकली.
या वेळी आरडाओरड एकूण शेजारी जागे झाले. त्यातील सहा जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. बापूराव गरड यांनी मोटारसायकलवर बसलेल्या तिघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याला पाठमागून घट्ट मिठी मारली. ही झटापट अर्धातास चालली. 
त्या वेळी गावातून मोठा जमाव एकत्र येत आहे, आपले काही खरे नाही, असे समजताच मोटारसायकलवर मध्यभागी बसलेल्या चोरट्याने आपल्या गावठी कट्ट्यातून पाठलाग करणाऱ्या दोघांवर गोळीबार केला. यामध्ये खंडू गरड व भरत बर्डे हे गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी नगर येथे रुग्णालयात हलविले आहे. या बाबत माहिती कळताच पोलीस  निरीक्षक चंद्रशेखर यादव  घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दोन जिवंत काडतुसे सापडली. अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT