Graduate Constituency Election One lakh 16 thousand 319 voters for graduates Dr Rajendra Bhosle 147 polling stations politics ahmednagar
Graduate Constituency Election One lakh 16 thousand 319 voters for graduates Dr Rajendra Bhosle 147 polling stations politics ahmednagar  Esakal
अहमदनगर

Graduate Constituency Election : पदवीधरसाठी एक लाख १६ हजार ३१९ मतदार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गुरुवारी जाहीर केली. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. ३० जानेवारीला मतदान होणार असून, १ लाख १६ हजार ३१९ मतदार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार आहे. निवडणुकीसाठी मोठ्या गावांसह महसूल मंडल पातळीवर १४७ मतदान केंद्रे राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नायब तहसीलदार गोसावी यावेळी उपस्थित होते. डॉ. भोसले म्हणाले, की नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना ५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

त्याच दिवसापासून १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. छाननी प्रक्रिया पूर्ण करून ३० जानेवारीला मतदान होईल. २ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन ४ फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नाशिक विभागातील पाच जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष, व्हिडिओग्राफी कक्ष आदींची स्थापना करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर निवडणुकीच्या देखरेखीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तीन पथके नियुक्त करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील १ हजार ६९३ मतदारांची नोंदणी नाकारण्यात आलेली आहे. अर्जामध्ये अपूर्ण माहिती, फोटो नसणे, मतदार नोंदणी अर्जावर सही नसणे, दुबार नोंदणी करणारे, दुसऱ्या मतदारसंघातील रहिवासी असणे, ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज सादर केल्याने अर्ज बाद केले आहेत.

- जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Marathi News Live Update: पुण्यात चारचाकीच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू

Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

SCROLL FOR NEXT