Gram Panchayat members who do not issue caste certificate are in trouble 
अहिल्यानगर

जात प्रमाणपत्र न देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः निवडून आल्यानंतर मुदतीत जात पडताळणी समितीने दिलेले जात प्रमाणपत्र सादर न केल्याने तालुक्यातील हरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सात सदस्यंना जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावली आहे. 16 जूनपूर्वी जात प्रमाणपत्र सादर करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱी यांनी दिले आहेत.

हरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आरक्षित जागेकरिता काही ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक लढवली. या जागांवर ते निवडून आले आहेत. परंतु निवडणुकीत नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या हमीपत्रानुसार त्यांनी निवडून आल्याच्या घोषित झालेल्या दिनांकापासून बारा महिन्याच्या आत मुदतीत जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सक्षम अधिकाऱ्याकडे सादर केले नाही, असा अहवाल तहसीलदार प्रशांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता.

ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी आवश्यक असलेल्या जागेवर निवडून आलेल्या सदस्याने मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याची निवड रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्याने त्यांनी सात सदस्यांना संधी देऊन 16 जून रोजी किंवा पूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचेकडे सादर केल्याचा लेखी पुरावा सादर करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.

हरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अस्मिता दीपक नवगिरे, सदस्य सुनील शिणगारे, रमेश भालेराव, अनिता भालेराव, बाळासाहेब पवार, श्रीमती उषाबाई कांबळे, सागर सोनावणे यांचा त्यात समावेश आहे. यापैकी रमेश भालेराव, अनिता भालेराव, बाळासाहेब पवार यांंनी तहसील कार्यालयात भेटून आवश्यक माहिती सादर केली अाहे. इतरही सदस्य 16 जून रोजी आदेशानुसार प्रमाणपत्रे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Final : रेफरी झोपलाय का? अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कप सेट केल्याचा आरोप... दोन घटना, ज्याने फुटबॉल विश्वात संताप, Video

Lionel Messi : अर्जेंटिनाच्या कर्णधाराने इतिहास रचला, ६६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू...

IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली

IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

SCROLL FOR NEXT