Groundnut production is likely to decline 
अहिल्यानगर

भुईमुगाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : पावसाने थैमान घातल्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, कांदारोपे, मका, बाजरी संकटात आहे. अतिपावसाचा मोठा फटका बसल्याने भुईमुगाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भुईमुगाची अवाजवी वाढ झाल्याने अनेक ठिकाणी शेंगा खूप कमी प्रमाणात लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 
भुईमुगासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन पोषक ठरते. अतिपावसामुळे या वर्षी अनेकांचे खरीप पाण्याखाली गेले. नदीपट्ट्यासह पाणथळ जमिनीत सध्या प्रचंड पाणी आहे. सुरवातीपासूनच पावसाने सलग हजेरी लावली. रोज नियमित जोरदार पाऊस पडतो.

अतिपाण्यामुळे शेकडो एकरांवरील खरिपाचे नुकसान झाले. भुईमुगाला यंदा शेंगा कमी लागल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतकरी सांगतात. 
आतापर्यंत तालुक्‍यात 690 मिलिमीटर पाऊस झाला असून, श्रीरामपूर मंडलात 743, बेलापूर मंडलात 588, उंदीरगाव मंडलात 668 आणि टाकळीभान मंडलात 734 मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. शेतांमध्ये पाणी साचल्याने पाण्यातच भुईमूग काढण्याची वेळ आली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चशिक्षितांना मोठा धक्का! कमी शिक्षण असलेल्यांसाठी राखीव पदांवर दावा करता येणार नाही; Supreme Court चा महत्त्वाचा निर्णय

Tuljapur Temple: भवानीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची लूट, तुळजापूरमध्ये बोगस पुजारी, लुटारू एजंटांकडून श्रद्धेचा बाजार

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा

Shahuwadi Robbery : शाहूवाडीतील दुर्गम भागातील पाटीलवाडीत दरोडा; मायलेक जखमी, सोने, पैसे सगळेच लुटले

'दुप्पट परतावा’च्या आमिषाला पोलीसही बळी... कोल्हापुरातील रॅकेटची राज्यभर चर्चा; गुन्ह्याचा तपास करणारेच कसे अडकले?

SCROLL FOR NEXT