Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा

Breaking Marathi News live Updates 04 June 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Nashik Legislative Council Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

- नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

- भाजपचे गणेश गीते, त्यांचे बंधू गोकुळ गीते आणि राष्ट्रवादीचे गोरख बोडके यांनी दाखल केलेले अर्ज कायम असल्यानं शिंदेसेनेची चिंता वाढली

- गणेश गीते, गोकुळ गीते आणि गोरख बोडके आज उमेदवारी मागे घेतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

- काल गणेश गीते यांनी मुंबईत जाऊन गिरीश महाजन यांची घेतली होती भेट

- तर दुसरीकडे काल उदय सामंत आणि गोरख बोडके यांच्यातही झालीय चर्चा

- गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती

- दुपारपर्यंत होणाऱ्या घडामोडींवर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून

- तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यास शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग होणार मोकळा

- त्यामुळे आजचा दिवस नाशिकच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com