Guardian Minister Mushrif was also shocked by the poverty of Parner's MLAs
Guardian Minister Mushrif was also shocked by the poverty of Parner's MLAs 
अहमदनगर

पारनेरच्या आमदारांच्या साधेपणाने पालकमंत्री मुश्रीफही अचंबित

मार्तंड बुचुडे

पारनेर ः पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या साधेपणाची चर्चा नेहमीच होत असते. ते कार्यकर्त्यांना नेहमीच मानाचे स्थान देतात. स्वतः कोणताही बडेजाव न  मिरवता कारभार हाकतात. इतरांना निवडणुकीत पैसे वाटावे लागतात. मात्र, लंके यांना निवडून आणण्यासाठी लोकांनी वर्गणी केली. या वर्गणीचा स्वतः उपमुख्यमंत्र्यांनीही जाहीर भाषणात उल्लेख करून लंके यांचे कौतुक केले होते.

एकदा मंत्रालयातील आमदार निवासात लंके यांचे कार्यकर्ते झोपले होते. लंके काम आटोपून रात्री उशिरा तेथे गेले. तेव्हा लंके यांनी खालीच झोपणे पसंत केले होते. त्यांच्या साधेपणाची चर्चा सोशल मीडियात नेहमीच होत असते. काल पालकमंत्री मुश्रीफ यांनी त्याचा अनुभव घेतला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल (ता. 26 ) आमदार नीलेश लंके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत आमदार लंके यांचे वडील ज्ञानदेव व मातोश्री शकुंतला लंके यांनी केले.

आमदार लंके यांचे साधे घर व साध्या राहाणीमुळे पालकमंत्री मुश्रीफही भारावून गेले. त्या नंतर पालमंत्र्यांच्या हस्ते हंगे गावातील बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्र्यांनी लंके यांच्या घरी चहापानही केले. 

हंगे ग्रामपंचायतीची निवडणूक आमदार लंके यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झाली. त्या गावकारभा-यांचा सत्कारही या वेळी थेट   मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. थेट पालमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार  झाल्याने सदस्यही अतिशय भारावून गेले.

या वेळी जिल्हा परीषद सदस्य राणी लंके, दीपक लंके, चंद्रकांत मोढवे, राजेंद्र दळवी, राजेंद्र शिंदे, संदीप  शिंदे, धोंडीभाऊ नगरे, सुहास नगरे, नंदू सोंडकर तुकाराम नवले, आदी मान्यवर उपस्थी होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT