पगारासाठी गुरुजी देतात ‘हप्ता’; ६० लाखांची बिदागी कोणाच्या घशात?
पगारासाठी गुरुजी देतात ‘हप्ता’; ६० लाखांची बिदागी कोणाच्या घशात? Sakal
अहमदनगर

Ahmednagar News : पगारासाठी गुरुजी देतात ‘हप्ता’; ६० लाखांची बिदागी कोणाच्या घशात?

अशोक निंबाळकर

अहमदनगर : अवैध धंदे करणारे लोकं हप्ते देत असल्याचे आपण ऐकले असेल. मात्र, सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील गुरुजींना ''हप्ता'' द्यावा लागतो, तोही पगार काढण्यासाठी! ही रक्कम महिन्याऐवजी वर्षाकाठी असते एवढाच काय तो फरक. मार्चएण्डमुळे वसुली सुरू झालीय. दरवर्षी हे कलेक्शन सुमारे ५० लाखांवर जाते.

या वसुलीची जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा असते. सर्वच गोष्टींबाबत सजग असलेले गुरुजी याबाबत मात्र गप्प आहेत. जे शिक्षक हप्ता देण्यास टाळाटाळ करतात, त्यांच्या शाळांची तपासणी होते.

काहींबाबत कोणत्याही थराला जाऊन तक्रारी होतात. त्यामुळे हप्त्याबाबत तक्रार करण्यास कोणी धजावत नाही. स्वखुशीने ही रक्कम दिली जात असल्याचाही काही शिक्षकांचे म्हणणे आहे. याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो होऊ शकला नसल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही.

जिल्ह्यात सुमारे ११ हजारांवर शिक्षक आहेत. त्यातील बहुतेक सर्वांनाच या हप्तेखोरीचा त्रास होतो. शालार्थ ॲपद्वारे शिक्षकांची पगार बिले काढली जातात. त्यासाठीच ही रक्कम वसूल केली जाते.

एकेका शिक्षकाला वर्षाकाठी ४०० ते ६०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात. वर्षातून एकदाच ही रक्कम द्यायची असल्याने त्याचे कोणाला ओझे वाटत नाही. तक्रार न होण्यामागे हेही कारण असल्याचे गुरुजींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

जिल्ह्यात सुमारे ११ हजार शिक्षक आहेत. २०१३-१४ पासून शालार्थ ॲपद्वारे या शिक्षकांचे पगार केले जातात. मुख्याध्यापकाने पगारबिले तयार करणे अपेक्षित आहे. मात्र, हे काम केंद्रातील एक तंत्रस्नेही शिक्षकच करतो. त्याच्यामार्फतच हे कलेक्शन केले जाते. प्रारंभी हे काम डाटा एन्ट्री ऑपरेटर करीत.

मुख्याध्यापकांऐवजी हे काम केंद्रातील एक तंत्रस्नेही शिक्षक करतो. मुख्याध्यापकाला दिलेला शालार्थचा आयडी आणि पासवर्ड संबंधित शिक्षकाकडे असतो. तोच हे काम करतो. मागे एकदा हा मुद्दा समोर आला तेव्हा मुख्याध्यापकांकडून आम्हीच हे काम करीत असल्याचे शिक्षण विभागाने लिहून घेतल्याचे समजले.

आता शिक्षक संख्या आणि वसूल केली जाणारी रक्कम याचा ताळेबंद केला, तर ती अर्ध्या कोटीवर जाते. ती रक्कम कोणाच्या घशात जाते, हा संशोधनाचा विषय. यावर शिक्षकांच्या संघटनेचा कोणताही नेता बोलत नाही.

कसे बनते पगारबिल

जुलै महिन्यात शिक्षकांच्या वेतनात बदल होतो; अन्यथा वर्षभर कोणताच बदल नसतो. केवळ रजा, कामाचे दिवस वगैरे बाबी असतात. व्हाउचर नंबर टाकून डीडीओने (मुख्याध्यापक) बिल अप्रूव्ह करायचे असते. त्यानंतर ते डीडीओ - २ (गटशिक्षणाधिकारी) कडे जाते. यासाठी अवघे काही सेकंद लागतात. तिसऱ्या टप्प्यात ते शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत पोहोचते.

मुख्याध्यापकांना अनेक कामे असतात. त्यामुळे कोणता तरी तंत्रस्नेही शिक्षक त्यांना मदत करतो. त्याचे ''तंत्र'' वापरून हे काम करतो. त्यासाठी स्वखुशीने दोन पैसे दिले जातात. ते मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत नगण्य असल्याने कोणी तक्रार करीत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे.

- संजय कळमकर, शिक्षक नेते.

सीईओसाहेब एवढे कराच...

झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे तंत्रस्नेही, तसेच कर्तव्यदक्ष म्हणून परिचित आहेत. यंदाच्या बजेटमध्ये ती छाप दिसून आली. शिक्षणासाठी त्यांनी अभिनव योजना आणल्यात. जास्तीचा निधीही वळवलाय. त्यांनी गुरुजींकडून सुरू असलेल्या या हप्तखोरीचा छडा लावून ती बंद करावी, अशी गुरुजनांची अपेक्षा आहे.

कोठे, किती वसुली

ऑनलाईन+ ऑफलाईन पगारबिलासाठी गोळा केली जाणारी रक्कम

नगर - ५००+ टॅक्स

पारनेर - ५०० + टॅक्स ३००

नेवासा- ५०० + टॅक्स ४००

शेवगाव - ६५० + टॅक्स ३००

श्रीगोंदा - ७००

जामखेड - ६००

राहुरी - ६००

पाथर्डी - ७००

श्रीरामपूर - ४००

संगमनेर - ६००

अकोले - ६००

राहाता - ६००

कोपरगाव - ५००

कर्जत - वसुली नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT