Guruji's liquor store at Akole in Nashik 
अहिल्यानगर

नाशिकमधील गुरूजींचा अकोल्यात दारू गुत्ता; पोलिस कारवाई गेले तर म्हणाले, जीवच देईन

शांताराम काळे

अकोले : अकोले तालुक्‍यातील भंडारदरा येथील थर्टी फस्टला यावर्षी गालबोट लागले आहे. राजूर पोलिसांनी भंडारदरा जवळील मुरशेत येथील एका टेंट हाऊसवर धाड टाकत दारुसह एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले. संबंधित टेंट हाऊस हे इगतपुरी तालुक्‍यातील एका शिक्षकाचे आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भंडारदरा येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक भंडारदरा येथे आले होते. या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी राजूर पोलिस 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पेट्रोलिंग करीत असताना भंडारदरापासून जवळच मुरशेत येथील एका टेंट हाऊस पासून जात असताना त्यावेळेस या ठिकाणी दारुची विक्री पर्यटकांना जादा भावात विकली जात असल्याचे राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन पाटील यांच्या लक्षात आले.

राजूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत चार लाख दहा हजार रुपयांचा किंमती दारुचे दोन बॉक्‍स व तसेच चारचाकी ताब्यात घेतली. या वेळी या टेंटच्या मालकाने राजूर पोलिसांना "तुम्ही जर माझ्यावर कारवाई केली, तर मी आत्महत्या करेल', अशी धमकी दिली. विशेष म्हणजे हा टेंटचालक एका शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. राजूर पोलिसांनी दोन व्यक्तींना या संदर्भात ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या धाडसत्रामध्ये राजूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितिन पाटील यांच्यासह पथकाने कारवाई केली. अहमदनगर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT