Happy days in the life of farmers with silk farming 
अहिल्यानगर

रेशमाच्या शेतीने विणले सुखाचे धागे, लाखोंच्या उत्पन्नाचा सापडला मार्ग

सुनील गर्जे

नेवासे : दुष्काळ, अतिवृष्टी व गारपीट अशी संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली. मात्र, दुष्काळ असो वा अतिवृष्टी किंवा गारपीट, याचा कोणताही परिणाम होत नसल्याने, नेवासे तालुक्‍यात शंभरावर शेतकऱ्यांनी फायद्याच्या ठरणाऱ्या, तसेच शाश्वत बाजारपेठ व भाव आणि उत्पन्नाची हमी असलेल्या रेशीमशेतीची कास धरून नवा मार्ग शोधला आहे. यातून त्यांना वर्षाकाठी दीड ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळत आहे. 

तालुक्‍यातील वाकडी, माळी चिंचोरे, करजगाव, स्वच्छ ग्राम वडुले, देवगाव, पुनतगाव या उसाचे क्षेत्र असलेल्या सहा गावांतील शेतकऱ्यांनी सहा-सात वर्षांपासून नगर जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाच्या माध्यमातून रेशीमशेतीला सुरवात केली.

रेशीमशेतीचा प्रयोग यशस्वी होईल का, असा संशय गावातील अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र, शेतकऱ्यांनी जिद्दीने रेशीमशेती यशस्वी करीत आजपर्यंत या उद्योगातून खात्रीशीर उत्पन्न मिळविले व ही शेती फायद्याची असल्याचे सिद्ध करून दाखविले. 

वरील शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक ते दीड एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली. यातून एकरी एक-दीड ते अडीच लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे. या सर्व शेतकऱ्यांना मागील काही वर्षे कोशविक्रीसाठी कर्नाटकात जावे लागत होते. मात्र, आता जालना येथेही बाजारपेठ झाल्याने, खर्च आणि वेळ वाचत आहे. 

जिल्ह्यात 600 शेतकरी 
नगर जिल्ह्यात सहाशे शेतकऱ्यांनी रेशीमशेतीची कास धरली असून, त्यांपैकी नेवासे व शेवगाव या दोन तालुक्‍यांत सर्वाधिक रेशीमशेती क्षेत्र आहे. त्याखालोखाल राहाता, संगमनेर आणि गेल्या वर्षीपासून जामखेड व कर्जत भागातील शेतकरीही रेशीमशेतीकडे काही प्रमाणात वळले आहेत. 
 

"तुतीचे पीक अतिशय कमी पाण्यावर येते. त्यामुळे दुष्काळातही ही शेती वरदान ठरत आहे. रेशीमशेतीतून चांगले व शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने, ही शेती फायद्याची ठरत आहे. 
- दत्तात्रेय काळे, रेशीमशेती शेतकरी, वाकडी, ता. नेवासे 
 
"इतर पिकांपेक्षा पाणी, मनुष्यबळ व कमी श्रमात उत्पन्नाची हमी असल्याने व नुकसानीची शक्‍यता कमी असल्याने, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीमशेती करावी. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. 
- बी. डी. डेंगळे पाटील, रेशीम विकास अधिकारी, नगर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT