हसन मुश्रीफ ई सकाळ
अहिल्यानगर

हसन मुश्रीफ म्हणाले, 'अजूनही जिल्ह्याचा पालकमंत्री मीच'

आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : जिल्ह्याचे पालकत्व पालकमंत्री हसन मुश्रीफ सोडणार असल्याची सध्या चर्चा आहे. या चर्चेला आज (शुक्रवारी) स्वतः मुश्रीफ यांनी पूर्णविराम देत, पालकमंत्री मीच आहे, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूरचे पालकमंत्री होण्याची इच्छा असतानाही, राजकीय गणितांमुळे त्यांना पावणेदोन वर्षांपूर्वी नगरचे पालकमंत्रिपद स्वीकारावे लागले होते. ते मंत्रिपद सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.


हसन मुश्रीफ म्हणाले, की आगामी काळात नगर व कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. विधान परिषदेसह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर महानगरपालिका, नऊ नगरपालिका यांसह इतरही निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर एका मंत्र्याला अशा स्थितीत दोन जिल्ह्यांकडे लक्ष देणे अवघड असल्याने, तसेच होम ग्राउंड म्हणून कोल्हापूरकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
भाजपच्या आरोपांत तथ्य नसल्याचे सांगत, माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात त्यांच्यावर दोन दावे केल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या निवासस्थानी भेट देत मुश्रीफ यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या वेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आदींसह राष्ट्रवादीचे संगमनेर तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, दिलीप शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष प्रशांत वामन, अक्षय भालेराव, अमृता कोळपकर, अनिल कोळपकर, राहुल वर्पे, अमोल राऊत, माजी नगरसेवक शरीफ शेख, हाफीज शेख, अशोक काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's Test Downfall: तुला हवं ते सर्व दिलं अन् तू टीम इंडियाचं वाटोळं केलंस! गौतम गंभीरच्या हट्टापाई कसोटीत आपली पिछेहाट...

SMAT 2025: ऋतुराज गायकवाडने मोडले विराट-गिलचे विक्रम, पण महाराष्ट्राचा पहिल्याच सामन्यात पराभव; पृथ्वी शॉही अपयशी

Barshi News : अखेर बार्शीच्या 'त्या' ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा मृत्यू; नोकरीवरुन काढून टाकण्याची दिली होती धमकी

Wagholi News : आठवीत शिकणाऱ्या मुलाची चिट्ठी लिहून मुलीला जीवे मारण्याची धमकी

Latest Marathi News Live Update: हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

SCROLL FOR NEXT