anil rathod 
अहिल्यानगर

ते म्हणतात - तपोवन रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार 

सकाळ वृत्तसेवा

नगर : मुख्यमंत्र्यांच्या निधीतून साडेतीन कोटी रुपये मंजूर झालेल्या तपोवन रस्त्याचे झालेले काम अत्यंत निकृष्ट व खालच्या दर्जाचे आहे. तपोवन रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची पूर्वीप्रमाणेच अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. त्यामुळे हा रस्ता ठेकेदाराने पुन्हा खोदून परत पहिल्यापासून काम करावे, अशी मागणी शिवसेना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंतांना करणार आहे. जर रस्त्याचे काम पुन्हा सुरु केले नाही तर शिवसेना मोठे जनआंदोलन उभारेल, असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला. 

तपोवन रस्त्याच्या कामाची पाहणी शिवसेनच्या शिष्टमंडळाने आज सकाळी करुन रस्त्याच्या नव्याने कामाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा व ठेकेदाराचा निषेध शिवसेनेतर्फे करण्यात आला. तपोवन रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा व निकृष्ट कामाचा निषेधाच्या मजकुराचा फलक तपोवन रस्त्यावर शिवसेनेतर्फे लावण्यात आला आहे. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, गिरिष जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, उपशहरप्रमुख डॉ.चंद्रकांत बारस्कर, रवी वाकळे आदी उपस्थित होते. 

अनिल राठोड म्हणाले, तपोवन रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी अनेक वर्षांपासून केलेल्या पाठपुरवठा व आंदोलनामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता मंजूर झाला. साडेतीन कोटी रुपयांमधून होणाऱ्या या रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार व नगर शहराला अभिमानास्पद वाटेल असे होईल, असे वाटले होते मात्र रस्त्याचे झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा सरळसरळ दिसत आहे. राज्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे या कामाबद्दल तक्रार करणार आहे. 

पाऊस आला छोटा.... दावा ठरला खोटा... 
मुळात शिवसेनेच्या प्रयत्नातून तपोवन रस्त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून साडेतीन कोटींचा निधी मिळाला. पण नेहमीप्रमाणे लोकांची दिशाभूल करुन "त्यांनी' सवयीप्रमाणे श्रेय लाटले. श्रेय लाटण्याबरोबरच आणखी काय लाटले गेले हे पहिल्याच पावसात उघडे झाले आहे. पाऊस आला छोटा.. दावा ठरला खोटा. त्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडल्याने जबाबदारी ढकलण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा चालू आहे. अशा दुतोंडीवृत्तीलाच डांबर फासण्याची वेळ आली आहे. केवळ 10 दिवसातच या महत्वाच्या रस्त्यावर पहिल्याच पावसात भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम पुन्हा दर्जेदार होईपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT