ahmednagar
ahmednagar sakal
अहमदनगर

कामगार-शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मी स्वतः लक्ष घालून कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पारनेर येथे पारनेर कारखान्याच्या विक्रीप्रकरणी सुरू झालेल्या ईडी व पोलिस खात्याच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पारनेर कारखाना बचाव कृतिसमितीने सोमय्या यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी, ‘मी पारनेरला येऊन कारखान्याला भेट देऊन शेतकरी व कामगारांशी संवाद साधेन. कारखाना विक्रीप्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराबाबत बोलेन,’ असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या आज (ता. 23) पारनेरला आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठाकरे सरकार माफियांचे सरकार आहे. ते स्थापन झाल्यापासून त्यांनी राज्यात हाहाकार उडविला. लोकांना घराबाहेरसुद्धा पडू देत नाहीत, ना गणेशदर्शन, ना देवदर्शन. या सरकारचा जन्मच मुळात भ्रष्टाचार व माफियागिरीतून झाला असल्याचा घणाघाती आरोप सोमय्या यांनी केला.

सोमय्या म्हणाले, की पारनेर कारखाना क्रांती शुगरने विकत घेतला. तो विकत घेण्यासाठी 32 कोटी रुपये कसे जमा केले, ते कोणत्या मार्गाने दिले, क्रांती शुगरकडे पैसेच नव्हते, तर त्यांना लिक्विडेटरने कारखाना विकलाच कसा, असे प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले. तसेच, कारखान्याने कर्जापोटी राज्य सहकारी बँकेकडे पैशांची मागणी केल्यानंतर याच बँकेने कर्ज कसे दिले, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी व कामगारहितासाठी कारखाना चालला पाहिजे. मात्र, त्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे. गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांना शिक्षाही झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

भाजपचे नेते बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अरुण मुंढे, कारखाना बचाव कृतिसमितीचे रामदास घावटे, बबन कवाद, साहेबराव मोरे, विश्वनाथ थोरात, अश्विनी थोरात, सुनील थोरात, सागर मैड, सुभाष दुधाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पगार होतात का?

सोमय्या यांनी आज कामगारांशी चर्चा केली. तुम्ही किती वर्षांपासून येथे काम करता, पगार वेळेवर होतात का, याबाबत माहिती घेतली. कामगारनेते शिवाजी औटी यांनी कामगारांच्या व्यथा मांडल्या. सुभाष बेलोटे यांनी मागण्यांचे निवेदन दिले. बचाव समितीचे रामदास घावटे यांनी स्वागत केले. खंडू भुकन यांनी आभार मानले.

‘त्या’ कारखान्याबाबत तक्रारी नाहीत

श्रीगोंदा कारखान्याकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकले आहेत.याबाबत आपण चौकशीची मागणी करणार का, याकडे सोमय्या यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, की त्याबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या नाहीत. तक्रारी आल्यास मी त्यामध्ये निश्चित लक्ष घालीन.

परब, राऊत यांची लायकी काय?

माझ्यावर साडेपाचशे कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा लावतात व आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर मात्र सव्वा रुपयाचा दावा केला. या अनिल परब व संजय राऊत यांची लायकी काय, असा प्रश्नही या वेळी सोमय्या यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT