Helicopter fish has been found in Siddhatek Ujani reservoir.jpg
Helicopter fish has been found in Siddhatek Ujani reservoir.jpg 
अहमदनगर

सिद्धटेक: उजनी फुगवट्यात 'हेलिकॉप्टर'ची घुसखोरी..!

सचिन गुरव

सिद्धटेक (अहमदनगर) : राज्यातील सर्वात मोठ्या जलाशयांपैकी एक असणाऱ्या 'उजनी' जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसमोर एका 'नको असलेल्या' माशाचे संकट उभे ठाकले आहे. या माशाचे नाव आहे 'हेलिकॉप्टर' किंवा सकर. या माशांपासून मच्छीमारांना फायदा कमी अन् तोटाच अधिक आहे.

'उजनी' धरणाचा फुगवटा हा धरणापासून जवळपास १६० किलटर अंतरापर्यंत आहे. या परिसरात सकर मासा आता मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. हा मासा काहीसा 'मांगूर' माशाप्रमाणेच उपद्रवी आहे. तो घातकही असून विद्रुप आहे. मच्छीमारांनी नदीपात्रात टाकलेल्या जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हा मासा करतो. नदीपात्रातील शेवाळ आणि इतर माशांची अंडीदेखील हा मासा खातो. इतर माशांपेक्षा टणक व मजबूत असल्याने तो सुरक्षित राहतो. त्यामुळेच त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. हा मासा विद्रुप असल्याने व पूर्ण शरीरावर काटे असल्याने त्याला दरही कमी व ग्राहकही कमी मिळतात. या माशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जर हा मासा जाळ्यात अडकला तर ते जाळे तोडूनच काढावे लागते. त्यामुळे महागड्या जाळ्यांचे व पर्यायाने मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे.

मत्स्यव्यवसाय अडचणीत...

उजनी पाणलोटक्षेत्रात अनेक वर्षे मत्स्यबीज सोडण्यात आले नसल्याने मुनिया, आहेर, खदरा, घोगरा, वाम, मरळ, चिलापी, शेंगळ, शिवडा, कानस, टाकर या माशांच्या लोकप्रिय प्रजाती नामशेष होत आहेत. त्यातच मांगूर व सकरमुळे या माशांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसायास गतवैभव मिळवून देण्यासाठी धरणपात्रात नियमितपणे मत्स्यबीज सोडणे अत्यावश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT