Hello, you are positive Until then she came to Shrigonda with children 
अहिल्यानगर

हॅलो, तुम्ही पॉझिटिव्ह आहात... तोपर्यंत ती श्रीगोंद्यात मुलांसह आलेली

संजय आ. काटे

श्रीगोंदे : मुंबई येथून कोरोनाबाधित महिला प्रवास करुन श्रीगोंद्यातील एका गावी आली. ती महिला येताना रितसर परवानगी घेवून दोन मुलांसह आली. मात्र येथे पोचली आणि मुंबईतून फोन आला तुमचा कोरोना अहवाल पाॅझिटिव आला आहे. सगळ्यांचीच धांदल उडाली.

श्रीगोंद्याच्या आरोग्य यंत्रणेने त्यांना रातोरात नगरला पाठविले. मात्र, जिल्हा रुग्णालयात त्यांचा घशाचा स्त्राव घेतलाच नाही. आरोग्य विभागाची उदासीनता समोर आली आणि आज पुन्हा त्यांना नगरला हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - बेरोजगारीची नो चिंता... रोहित पवार देणार नोकरी

त्या महिलेचा मुबंईतील अहवाल कोरोना बाधित आहे. नगर तालुक्याच्या हद्दीजवळ असणाऱ्या गावात घडलेली ही घटना अगोदर मुंबई आणि नंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयाची पोलखोल करण्यास पुरेशी आहे. भाईंदर, मुंबई येथे या महिलेचे पती कोरोना बाधित झाल्याने मरण पावल्याची माहिती येथील तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर यांनी दिली. सदर महिला काही दिवस मुंबईत क्वारंटाईन होती. मात्र काल रविवारी ती तालुक्यातील तीच्या गावी दोन मुलांसह  परतली. रात्री ती आली आणि पाठीमागून फोन आला की त्या महिलेचा कोरोना अहवाल पाॅझिटिव आला आहे. कोरोनाबाधित व्यक्तींच्या अहवालात तीचे नाव आहे.  

तिचा पती कोरोनाने दगावलाय
त्या महिलेता पती कोरोनाने दगावला आहे, तिचा अहवाल प्राप्त झालेला नाही, तरीही ती श्रीगोंद्यात कशी येवू शकते, या प्रश्नाला तिच्याकडे  असणारे अधिकृत पासेस हे उत्तर मिळाले. धक्कादायक म्हणजे सदर महिलेला ५ जूनपर्यंत क्वारंटाईन राहण्याचे आदेश प्रशासनाचेच असताना असे प्रवासाचे पासेस कसे मिळाले.

पुन्हा नगरला नेले

त्यापुढचा कहर म्हणजे ही महिला येथे आल्यावर व हे अहवालाचे समजले. त्यानंतर डाॅ. खामकर यांनी तातडीने रात्रीच ते कुटुंब नगरला जिल्हा रुग्णालायात रवाना केले. मात्र तेथे त्यांच्या घशाचा स्त्राव न घेताच परत पाठविल्याचे आज सकाळी समजले. त्यानंतर बेलवंडीचे पोलिस निरीक्षक अरविंद माने व आरोग्य यंत्रणेने तेथे जात पुन्हा ते कुटुंब नगरला नेले.

हाती बाधित असल्याचा रिपोर्ट

या सगळ्या गोंधळात यंत्रणेच्या हाती ती महिला कोरोना बाधित असल्याचा  २२ मे चा अहवाल पडला. आता अनेक प्रश्न समोर येत असतानाच कोरोनाबाधित असतानाही सदर महिलेला प्रवासाची परवानगी कशी मिळाली आणि तिच्यावर नगरला उपचार न करता पुन्हा गावी का पाठविले, या प्रश्नांचे उत्तरे आरोग्य यंत्रणेला द्यावी लागणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT