The help of private doctors to government doctors in the fight against corona 
अहिल्यानगर

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सरकारी यंत्रणेला "यांचा' मोठा आधार

दौलत झावरे

नगर : कोरोनासह आता सारी आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेने खासगी डॉक्‍टरांच्या मदतीने उपचार सुरू केले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत 40 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यात मार्चमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात उपाययोजना राबविण्यात आल्या. सुरवातीला सरकारी डॉक्‍टरांच्या मदतीने कोरोनाबाधितांवर उपाययोजना केल्या जात होत्या.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढू लागल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी डॉक्‍टरांची बैठक घेऊन या लढ्यात त्यांनीही मदत करावी, असे आवाहन केले. त्यानुसार, शहरातील फिजिशिएन्स डॉक्‍टरही आता सरकारी डॉक्‍टरांच्या मदतीने मैदानात उतरले आहेत. कोरोनासह आता जिल्ह्यात सारी आजारानेही डोके वर काढले आहे. 

सरकारी डॉक्‍टरांवरील ताण कमी झाला

जिल्ह्यात सारीचे एकूण 50 रुग्ण असून, त्यांची देखभाल करण्यासाठी खासगी डॉक्‍टरांची भूमिका महत्वाची ठरत आहे. कोरोना रुग्णांवरही त्यांच्याकडून उपचारास मदत होत आहे. खासगी डॉक्‍टरांच्या मदतीमुळे सरकारी डॉक्‍टरांवरील ताण कमी झाला आहे. त्यामुळे सरकारी व खासगी डॉक्‍टरांची सांगड घालत ड्युटी लावल्या आहेत. या सर्वांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात 56 पैकी 40 जण कोरोनामुक्त होण्यास मोलाची मदत झाली. सध्या 12 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच चौघांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा रुग्णालयातील "ओपीडी' बंद

कोरोनाच्या कामात यंत्रणा गुंतली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील इतर सर्व ओपीडी बंद आहेत. त्यामुळे ओपीडीत येणाऱ्या रुग्णांना त्यांच्या आजारानुसार नियुक्त केलेल्या खासगी डॉक्‍टरांकडे तपासणीसाठी पाठवून उपचार केले जात आहेत. 

सर्व ओपीडी पुन्हा सुरू करणार

कोरोनाबाधित रुग्णांवर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्व ओपीडी पुन्हा सुरू करणार आहोत. खासगी डॉक्‍टरांचीही आम्हाला चांगली मदत मिळत आहे. 
- डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय 

जवळच्या कर्मचाऱ्यांनाच बोलवा

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टर, आरोग्यसेविका व इतर कर्मचाऱ्यांना नगरला बोलाविण्यात येत आहे. बाहेरील तालुक्‍यातील कर्मचाऱ्यांना बोलाविण्याचा अट्टहासामुळे त्यांचा ये-जा करण्यातच वेळ जातो. या कर्मचाऱ्यांच्या जेवणाचीही गैरसोय होते. त्यामुळे शहराजवळील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्याच नियुक्‍त्या कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT