Holi at Madhi was lit on Sunday 
अहिल्यानगर

भटक्याच्या पंढरीतील मानाची होळी पेटवली पोलिस बंदोबस्तात

सकाळ वृत्तसेवा

तिसगाव : गोपाळ समाजाला मान असलेली श्रीक्षेत्र मढी येथील मानाची होळी पोलिस बंदोबस्थात उत्साहात पेटविण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मढी यात्रेला बंदी घातल्याने फक्त गोपाळ सामाजाच्या मानकऱ्यांनाच होळीच्या ठिकाणी प्रवेश देऊन हा उत्सव साजरा करण्यात आला. 

रविवारी सायंकाळी पाच वाजता गोपाळ बांधव पोलिस बंदोबस्थात मानाच्या गोवऱ्या घेण्यासाठी कानीफनाथ गडावर आले. देवस्थान समितीने गोपाळ समाजचे मानकरी माणिक लोणारे, रघुनाथ काळापहाड, नामदेव माळी, पुंडलिक नवघरे, हरिभाऊ हंबीरराव, सुंदर गिऱ्हे यांना मानाच्या गौवऱ्या दिल्या. मानाच्या गौवऱ्या दिल्यानंतर पोलिस बंदोबस्थात नाथांचा जयजयकार करत दत्त मंदिराजवळ वाजत-गाजत गोवऱ्या पोचल्या. 

तेथे मानकरी गोलाकार बसले. पूजा विधी झाल्यावर पाच वाजता होळी पेटली. होळी पेटताच गोपाळ बांधवांनी नाथांचा जय जयकार करत होळी भोवती प्रदक्षिणा पुर्ण केल्या. 

आजच्या दिवशी मढीचे ग्रामस्थ होळीचा सण साजरा करत नाहीत. होळीचा सण सार्वजनिकरीत्या साजरा न करणारे मढी गाव राज्यात एकमेव आहे. पारंपारिक जागेवरच होळी पेटविली.

देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, भाऊसाहेब मरकड, श्‍यामराव मरकड, डॉ. विलास मरकड, कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड यांनी गोपाळ समाजातील मानकऱ्यांचा सत्कार केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT