Husband and wife should come counseling center Sadhana Jadhav ahmednagar sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : पती-पत्नीने समुपदेशन केंद्रात यावे; साधना जाधव

न्यायमूर्ती जाधव; जिल्हा न्यायालयात ‘चला बोलू या’ आणि ‘सुकून’ या समुपदेशन केंद्राचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : पती-पत्नीने व पक्षकारांनी न्यायालयात जाण्याअगोदर समुपदेशन केंद्रात यावे. बोलण्यातून विषय सुटतात म्हणून तुटणारे कुटुंब पुन्हा जुळावे, कुटुंबव्यवस्था वाचावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने देशात सर्वप्रथम ‘चला बोलू या’ आणि ‘सुकून’ या समुपदेशन संकल्पना सुरू केल्या आहेत. या समुपदेशन केंद्रामुळे अनेक संसार जोडले जातील, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी केले.

अहमदनगर जिल्हा न्यायालयात ‘चला बोलू या’ आणि ‘सुकून’ या दोन केंद्रांसाठी स्वतंत्र कक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नव्या इमारतीत सुरू करण्यात आले आहेत. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या हस्ते त्यांचे उद्‌घाटन करण्यात आले.

न्यायमूर्ती रेवती मोहिते, प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष अनिल सरोदे, के. एम. देशपांडे, उपाध्यक्ष संदीप वांढेकर, सचिव स्वाती नगरकर, प्रकल्प संचालक अमृता जोशी, समुपदेशक योगिता खेडकर, सर्व न्यायाधीश व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायमूर्ती जाधव म्हणाल्या, की या समुपदेशन केंद्रांमध्ये नाजूक विषय हाताळायचे असल्याने येथे प्रशिक्षित समुपदेशक नियुक्‍त केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांचेही प्रश्‍न सोडविले जाणार आहेत. बोलण्यातून विषय सुटत असल्याने या केंद्राचे नाव ‘चला बोलू या’ असे नाव ठेवले आहे. मानसिक आरोग्याबाबतही समुपदेशन केले जाणार आहे. अपर्णा जोशी यांनी प्रास्ताविकात दोन्ही समुपदेशन केंद्रांची माहिती दिली. ॲड. अभय राजे यांनी सूत्रसंचालन केले.

संभाषणाअभावी वाद

पूर्वी एकत्र पद्धतीचे कुटुंब होते. आता विभक्‍त कुटुंबव्यवस्था आली आहे. पती-पत्नीमध्ये संभाषण कमी झाल्यास त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. समुपदेशनामुळे विभक्‍त होण्यापासून कुटुंबे वाचतील, असा विश्‍वास न्यायमूर्ती रेवती मोहिते यांनी व्यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT