husband Arrested for not giving alimony to wife ahmednagar  Sakal
अहिल्यानगर

पत्नीस पोटगी न देणाऱ्यास अटक

दोन वर्षांपासून पोटगी चुकविण्यासाठी तो घर सोडून अन्यत्र राहत होता

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : पत्नीस पोटगी न देता घर सोडून बाहेर राहणारा मजहर आयाज शेख (वय 41, रा. मुकुंदनगर) यास भिंगार पोलिसांनी अटक केली आहे. दोन वर्षांपासून पोटगी चुकविण्यासाठी तो घर सोडून अन्यत्र राहत होता. आयाज अहमद शेख (रा. मुकुंदनगर) यांनी भिंगार - कॅम्प पोलिस ठाण्यात ता.28 डिसेंबर 2019 रोजी खबर दिली की, मुलगा मजहर शेख हा राहते घरून कोठेतरी निघून गेला आहे. त्यावरून भिंगार पोलिस ठाण्यात हरविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस नाईक व्ही. सी. गंगावणे हे करीत होते. संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मजहर शेख हा पोटगी देत नसल्याने वॉरंट काढले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना खबऱ्याने माहिती दिली की, मजहर हा राहत्या घरी काही वेळेस येऊन जात आहे. सध्या तो घरी आला आहे. देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, पोलिस हवालदार जी. वाय. जठार, रघुनाथ कुलांगे, रमेश दरेकर, भानुदास खेडकर, एस. जी. शेख, राहुल द्वारके, के. जे. चव्हाण, एस. बी. सोनवणे यांच्या पथकाला पाठवून मजहरला अटक केली. त्यास संगमनेर येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 20 दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT