I am the don of Kukane village, beating the police 
अहिल्यानगर

मी कुकाणे गावचा डॉन आहे, जरा नीट रहा; पोलिसांनाच डॉनची दमबाजी

सुनील गर्जे

नेवासे : "तुम्ही मला ओळखत नाही... मी कुकाणे गावचा "डॉन' असून, माझ्या नादी लागलात, तर एकेकाचा काटा काढीन...' अशी धमकी देणाऱ्या तळीरामाला पोलिसी खाक्‍या दाखविताच या "डॉन'चा आवाज "डाऊन' झाला. दारूची नशा उतरताच "तो' पोलिसांशी नरमाईने बोलू लागला..!

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक अभिनव त्यागी यांच्या नेतृत्वाखाली नेवासे पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता. 24) कुकाणे पोलिस दूरक्षेत्रातील वाहतूक पोलिस कर्मचारी अमोल बुचकुल व पोलिस नाईक किशोर काळे, शिपाई गणेश गलधर, नितीन भताने, अंबादास गिते हे शेवगाव-नेवासे रस्त्यावर कुकाणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करीत होते. 

पोलिस कर्मचारी बुचकुल यांना आरोपी प्रकाश ऊर्फ बाळू मारुती साळुंके (वय 42, रा. कुकाणे) हा तोंडाला मास्क न लावता, दारूच्या नशेत रस्त्याने पायी फिरताना आढळून आला. बुचकुल त्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करू लागले तेव्हा साळुंकेने बुचकुल यांना शिवीगाळ करीत तेथून पळ काढला.

काही वेळाने हातात लाकडी दांडके घेऊन तो पुन्हा तेथे आला व पोलिसांना मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला. पोलिस त्याला समजावून सांगत असताना, त्याने बुचकुल व कॉन्स्टेबल गणेश गलधर यांना दांडक्‍याने मारहाण केली. 

"आव्वाज' खाली आला 
याबाबत कॉन्स्टेबल अमोल दत्तात्रेय बुचकुल यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांनी प्रकाश साळुंके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मात्र, त्यानंतर त्याचा "आव्वाज' कायम होता. पोलिसांचा दंडुका पडताच, त्याची नशा खाड्‌कन उतरली व तो पोलिसांच्या हाता-पाया पडू लागला. पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. 
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT