MLA Nilesh Lanke 
अहिल्यानगर

मी पस्तीस वर्षे हटत नसतो, आमदार लंकेंनी सांगितला राजयोग

मार्तंड बुचुडे

पारनेर ः ‘‘मला पस्तीस वर्षे राजयोग आहे. माझ्या आरोग्याचा विचार करणाऱ्यांनी चिंता करू नये. कोरोनाच्या संकटात अनेकांचे संसार उद्‍ध्वस्त झाले, तरी काही महाभागांनी संकटात मदत करण्याऐवजी त्रास दिला. अशा प्रकारे त्रास देणाऱ्या व गोरगरिबांची लूट करणाऱ्यांचा परमेश्‍वरच कार्यक्रम केल्याशिवाय राहाणार नाही,’’ असा टोला आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांना मारला.

वडगाव आमली येथे विविध विकासकामांच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार लंके बोलत होते. कोरोनाच्या संकटातही मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मी सतत्याने प्रयत्न करून मोठा निधी आणला आहे. तालुक्यातील एकही गाव विकासापासून वचित राहणार नाही, असेही लंके म्हणाले. (I-will-be-Parners-MLA-for-thirty-five-years)

या वेळी लंके कोरोना काळात आलेल्या दुःखद व धक्कादायक आठवणी कथन करताना भावनिक झाले होते. त्यांनी स्व. गुलाबराव डेरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी संभाजी रोहकले, सरपंच अमोल पवार, अॅड. राहुल झावरे, बापू शिर्के, श्रीकांत चोरे, संदीप रोहकले, गोवर्धन रोहकले, सूरज भुजबळ, प्रमोद गोडसे, भाऊसाहेब पटेकर, साहेबराव पवार, नवनाथ जाधव, नवनाथ ढोणे आदींसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.

कोविड सेंटरची देशभरात दखल

आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथे उभारलेल्या कोविड सेंटरची देशभरात चर्चा झाली. कोविड रूग्णांसाठी लंके यांनी वाहून घेतले होते. ते मुक्कामालाच कोविड सेंटरमध्ये थांबायचे. पवार कुटुंबीयांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली होती. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनेही आपले प्रतिनिधी पाठवून कोविड सेंटरच्या उभारणीची माहिती घेतली होती.

साई संस्थानच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही

साईबाबा फकीर होते. मीही फकीर आहे. मग अध्यक्ष होऊन संस्थानची वाहने व इतर सुविधा घेऊन मला पापाचा धनी व्हायचे नाही. संस्थानचा अध्यक्ष होऊन माझी कामे मी करणार, हे योग्य नाही. साई संस्थानच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, असे सांगून आमदार लंके यांनी या विषयावर पडदा टाकला. ((I-will-be-Parners-MLA-for-thirty-five-years))

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT