If land is taken without non-cultivation it will be fraud
If land is taken without non-cultivation it will be fraud 
अहमदनगर

तुम्ही बिगर एनए प्लॉट घेतला असल्यास फसलात म्हणून समजा!

सचिन सातपुते

शेवगाव : पुणे, मुंबईच नव्हे तर अगदी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणीही प्लॉट घेण्यासाठी लोकांचा कल असतो. परंतु स्वस्तात पडतो म्हणून एनए न झालेले प्लॉट खरेदी केले जातात. त्यावर घरही बांधले जाते. इतरांवर कुठे काय कारवाई झाली... मग आपल्यावरच कशी होईल.. असा त्या बिनधास्तपणामागे विचार असतो. परंतु सर्वसामान्य लोकं इथेच माती खातात.

हा तुकडेबंदी कायद्याचा भंग आहे. त्यात तुम्ही सापडलात तर फार मोठे नुकसान सहन करावे लागेल. कारण शेवगावात तशी कारवाई सुरू झालीय. 

तहसीलदार अर्चना भाकड- पागिरे यांनी कारवाई व दंडाच्या नोटिसा काढल्या आहेत. यामुळे संबंधित नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

"ग्रीन झोन'चे रूपांतर "यलो झोन'मध्ये न करता जमिनीचे तुकडे पाडून इतर कारणांसाठी वापर करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र, शहर व नजीकच्या बहुतांश शेतजमिनींचे तुकडे करून, बिगरशेती न करता निवासी व व्यावसायिक कारणांसाठी ती विकणारांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे.

बिगरशेती प्लॉटपेक्षा कमी भावात मिळणारी ही जागा घरासाठी सर्वसामान्य नागरिक खरेदी करतात. मात्र, हा व्यवहार तुकडेबंदी कायद्याचा भंग करणारा आहे, याची माहिती संबंधिताला नसते. त्याचा गैरफायदा घेऊन काही एजंट नागरिकांची फसवणूक करतात. शहरात असे शेकडो व्यवहार यापूर्वी झाले आहेत. 

तहसीलदार पागिरे यांनी शहर व परिसरातील "ग्रीन झोन'मधील सर्व गट नंबरची माहिती घेतली. संबंधितांनी घेतलेल्या जमिनीच्या बाजारमूल्याच्या 25 टक्के रकमेचा दंड भरून नियमित करता येण्यासारख्या, 265पैकी 170 प्लॉटधारकांना नोटिसा बजावल्या.

हे सर्व प्लॉटधारक मिरी रस्त्यावरील सातपुतेनगरच्या गट नंबर 1098मधील आहेत. तेथे निवासी व व्यावसायिक बांधकामे केलेल्या नागरिकांचे, अनेक वर्षांनंतर अचानक नोटिसा व मोठ्या रकमेचा दंडाचा आकडा पाहून धाबे दणाणले आहे. याबाबतची प्रक्रिया व कारवाईची माहिती देण्यासाठी संबंधितांना तहसील कार्यालयात बोलाविण्यात आले आहे. 


शासनाच्या तुकडेबंदी कायद्याचा भंग केलेल्या; पण दंडाची रक्कम जमा करून हा व्यवहार नियमित करता येण्यासारख्या प्लॉटधारकांनाच नोटिसा बजावल्या आहेत. त्यांनी सहकार्य केल्यास त्यांची खरेदी नियमित करून देण्यात येईल. शासनाच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या उर्वरित प्लॉटधारकांनाही नोटिसा बजावण्यात येतील. 
- अर्चना भाकड-पागिरे, तहसीलदार, शेवगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT