IG Dighavarkar came to Shrirampur in Gautam deer murder case 
अहिल्यानगर

उद्योजक हिरण हत्याप्रकरणी आयजींनी घातले लक्ष, तपासाची चक्रे वेगात

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे उद्योजक गौतम हिरण यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याबाबत आवाज उठवला होता.

हिरण यांची हत्या हे पोलिस प्रशासनाचे अपयश असल्याची टीका विखे पाटलांनी केली होती. काल रात्री या प्रकरणात दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे या प्रकरणात जातीने लक्ष घालून आहेत.

आज नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांच्यासह पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ. दीपाली काळे, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झालेल्या ठिकाणी 'बेलापूर-राहुरी बायपास' येथील ठिकाणाची पाहणी केली. ज्या परिसरात हिरण यांचा मृतदेह आढळला होता. त्या ठिकाणी 'वाकडी शिवारात' पोलीस फोजफाटा रवाना केला आहे.

या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

जी राम जी! विधेयकामुळे राज्यावर आर्थिक भार, आधीच तिजोरीवर ताण त्यात आणखी खर्च वाढणार

Drugs Seized : साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पुण्यासह पिंपरी, मुंबई, गोव्यात कारवाई; पाच जणांना अटक

शिल्पकलेचे 'भीष्माचार्य' हरपले! पद्मभूषण राम सुतार यांचं निधन

Driving License : वाहन परवान्यासाठी आता ‘जागते रहो’; रात्री एक वाजता स्लॉट खुले, संख्या कमी केल्याने अडचण

SCROLL FOR NEXT