Illegal passenger traffic has started on shanishinganapur shirdi road.jpg
Illegal passenger traffic has started on shanishinganapur shirdi road.jpg 
अहमदनगर

सात पोलिस ठाण्याची नजर असतानाही शिंगणापुर-शिर्डी प्रवासी वाहतूक दिमाखात सुरुच

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : शनिशिंगणापूर-शिर्डी रस्त्यावर सात पोलिस ठाण्याची नजर असतानाही जिल्ह्यातील सर्वात मोठी बेकायदा प्रवासी वाहतूक दिमाखात सुरु झाली आहे. आठ दिवसात एकही कारवाई झाली नसल्याने नवल व्यक्त होत आहे. 

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून ११ महिन्यापासून दोन देवस्थानचे दर्शन घडविणारी बेकायदा प्रवासी वाहतूक बंद होती. आता दर्शनासाठी गर्दी वाढू लागल्याने तीनशेहून अधिक वाहनांची वर्दळ नव्या जोमाने सुरू झाली आहे. आठ-दहा दिवसात एकाही पोलिस ठाण्याने अशा वाहनांवर एकही कारवाई केली नाही हे विशेष. 

शिर्डी, राहाता, बाभळेश्वर, कोल्हार, राहुरी, सोनई व शनिशिंगणापूर असे सात पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ही बेकायदा प्रवासी वाहतूक होते. शिर्डी व राहाता पोलिस ठाण्याचा अर्थपूर्ण व्यवहार साईबाबांच्या पुण्यभूमीत होत आहे तर अन्य पाच पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस आपला प्रसाद घेण्यासाठी शिंगणापूरला येतात. सध्या पुजासाहित्य दुकानदारांचे नाव व वाहनांची संख्या घेणे सुरु झाले आहे.

सध्या भाविकांच्या खाजगी वाहनावर कारवाईचा धडका सुरु असताना बेकायदा प्रवासी वाहतूक दिमाखात सुरु असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. शिर्डीतून भाविकांना शिंगणापुरला घेवून येणारे वाहन रस्त्याने चहा, उसाचा रस, नाश्ता व जेवणासाठी ठराविकच ठिकाणी थांबतात. पूजा साहित्य घेण्याची सक्ती व दमदाटी केली जाते.

या प्रवासी वाहतूक रॅकेटच्या सक्तीने मोठा त्रास होत असल्याचे भाविकांनी सांगितले. अशा प्रकारची बेकायदा प्रवासी वाहतूक सुरु नसल्याचे पोलिस सांगत आहेत. कोरोना लाॅकडाऊनचा मोठा फटका सर्वानाच झाला असल्याने सध्या सारं काही डोळे झाकूनच सुरु आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांनी याबाबत कारवाईचा आदेश द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT