st bus 2 
अहिल्यानगर

स्थलांतरितांचे तिकीट तहसीलदारांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा

नगर : लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित व्यक्ती आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करीत आहेत. त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित तालुक्‍यातील तहसीलदारांना देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज तसा आदेश दिला. 

तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांसाठी निर्गमित करण्यापूर्वी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यांच्या कार्यक्षेत्रात प्राप्त होणाऱ्या अर्जांनुसार जिल्हानिहाय याद्या तयार कराव्यात. अशा सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून तसे प्रमाणपत्र संबंधित व्यक्‍तीला देण्याचे नियोजन करावे. ज्या जिल्ह्यात जायचे आहे, तेथील जिल्हाधिकारी अथवा प्राधिकृत अधिकाऱ्यांची आवश्‍यक ती परवानगी असल्याची खात्री करावी. वाहनाची व्यवस्था नसेल, तर एसटी आगारव्यवस्थापकांशी समन्वय साधून बसची व्यवस्था करावी. बसचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंगसह आसनव्यवस्थेची खात्री केल्यावरच बस रवाना कराव्यात. मजूर, भाविक, विद्यार्थी, पर्यटकांना प्राधान्य द्यावे. कुठल्याही परिस्थितीत वैयक्तिक पास देऊ नयेत, असे आदेशात नमूद केले आहे. 

लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील, तसेच परजिल्ह्यातील 250 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळपर्यंत गावी रवाना केले. महापालिकेच्या निवारा केंद्रांत असलेल्या 103 नागरिकांची आज महापालिकेने वैद्यकीय तपासणी केली. त्यांची उद्या (बुधवारी) त्यांच्या गावी रवानगी होण्याची शक्‍यता आहे. महापालिका निवारा केंद्रांत असलेल्या उर्वरित नागरिकांच्या तपासण्या उद्या (बुधवारी) होणार आहेत. 

जिल्ह्यात अडकलेले परप्रांतीय व परजिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यानुसार तारकपूर आगारात 20 बस तयार केल्या आहेत. या बसचे निर्जंतुकीकरण महापालिका पथकाने केले. आज सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाने 250 जणांना त्यांच्या गावी पाठविले. उर्वरित नागरिकांनाही पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्या दृष्टीने आज महापालिकेकडून डॉन बॉस्को ग्रामीण केंद्र, नक्षत्र लॉन व काटवन खंडोबा परिसरातील महापालिकेच्या निवारा केंद्रांतील 103 नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली. त्यासंदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT