जागतीक तंबाखू सेवन विरोधी दिन 
अहिल्यानगर

सुगंधी तंबाखूच्या गोदामावर छापा

पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्य शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा केलेल्या गोदामावर कोतवाली पोलिसांनी छापा घातला. यावेळी एक लाख २१ हजार ८०० रुपये किमतीची सुगंधी तंबाखू जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली.

कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली, की केडगाव परिसरात काही व्यक्‍तींनी सुगंधी तंबाखूचा साठा केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोज कचरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केडगावातील भूषणनगरमध्ये छापा घातला. आरोपी अक्षय बापू राहिंज (वय २८, रा. भूषणनगर, केडगाव), माहरूफ अजीज शेख (वय २२, रा. काटवन खंडोबा, नगर) या दोघांच्या ताब्यातून पाच किलो वजनाच्या प्रत्येकी पाच बॅगा, ५० किलो सुगंधी तंबाखू, ४० किलो वजनाची तंबाखू असलेली १२ पोती, बारीक केलेली ३० किलो सुपारी, मावा तयार करण्याचे २० हजार रुपये किमतीचे मशिन, असा एक लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT