Sakal
अहिल्यानगर

एका दिवसात साडेतीन हजार शेतकऱ्यांनी केली ऊसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

सहकारी कारखान्यावर अशा पद्धतीने नोंदीसाठी गर्दी ही त्या कारखान्यावरील सभासदांच्या विश्‍वासाचे प्रतीक मानली जाते.

श्रीगोंदे (अहमदनगर) : पुढच्या गळीत हंगामात पहिल्याच टप्प्यात ऊस जाण्यासाठी मंगळवारी (ता. १५) नागवडे सहकारी साखर कारखान्यावर सभासदांनी रांगा लावल्याचे चित्र दिसले. काही सभासदांनी तर आदल्या रात्रीचा मुक्कामच तेथे केला. दिवसभरात साडेतीन हजार सभासदांनी सव्वादोन हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद दिली. सहकारी कारखान्यावर अशा पद्धतीने नोंदीसाठी गर्दी ही त्या कारखान्यावरील सभासदांच्या विश्‍वासाचे प्रतीक मानली जाते. (in one day, three and a half thousand farmers have registered sugarcane in nagawade cooperative sugar factory)

दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांनी कष्टातून सांभाळलेल्या या कारखान्यावर त्यांच्यानंतरही सभासदांचा विश्‍वास दृढ असल्याचे पुन्हा एकदा दिसले. विशेष म्हणजे आता झोनबंदी उठल्याने, कुठलाही शेतकरी कोणत्याही कारखान्याला ऊस देतो. तथापि, येथे मात्र नागवडे कारखान्यालाच आपल्या ऊसाची नोंद असावी व तेथेच ऊस जावा, यासाठी सभासदांचा अट्टहास दिसला. पुढच्या गाळप हंगामात पहिल्याच टप्प्यात ऊस जावा, यासाठी नोंदीच्या पहिल्याच दिवशी कारखाना कार्यस्थळावर मोठी गर्दी झाली होती. पहाटे पाच वाजताच नोंद देण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. यात भीमा व घोड नदीकाठच्या गावांतील सभासदांची संख्या जास्त होती.

कारखान्याचे सचिव बापूराव नागवडे म्हणाले, ‘मंगळवारी दिवसभरात कोरोना नियमांचे बंधन पाळून सभासदांनी ऊसलागवडीची नोंद केली. तीन हजार ५०४ सभासदांनी दोन हजार २८९ हेक्टर ऊसाची नोंद दिली. या नोंदीची आता शेतकी विभागामार्फत तपासणी होऊन नंतर त्याची पक्की नोंद केली जाईल.

बापूंनी घालून दिलेल्या आदर्शावर संचालक मंडळ काम करते. सभासदांचा विश्वास असल्यामुळेच नागवडे कारखान्यालाच ऊस देण्याची भूमिका मोठ्या स्पर्धेतही दिसते. या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही.

- राजेंद्र नागवडे, अध्यक्ष नागवडे कारखाना

(in one day, three and a half thousand farmers have registered sugarcane in nagawade cooperative sugar factory)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025 : बिहारच्या मतदार याद्यांमध्ये घोळ? आढळले चक्क नेपाळ, बांगलादेश अन् म्यानमारचे नागरिक

चाकूने वार करत डोकं भिंतीवर आपटलं!अभिनेत्रीला नवऱ्याने केली मारहाण, डोळ्यात मिरी पावडर फेकून केले वार

WHO Action : WHO कडून शेख हसीना यांना मोठा धक्का, मुलगी सायमा वाजिद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; पदावरून केली हकालपट्टी?

Lumpy Affected:'साेलापूर जिल्ह्यात ९०० जनावरे लम्पीबाधित'; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

Shravan 2025 Upvas Recipe: श्रावणात उपवासासाठी बनवा गरमागरम भगर-आमटी, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT