The independent office of Kukdi is an advantage to Shrigonda 
अहिल्यानगर

कुकडीच्या स्वतंत्र कार्यालयाचा श्रीगोंद्याला फायदाच

संजय आ. काटे

श्रीगोंदे : कुकडीचे कार्यालय श्रीगोंदे तालुक्‍यासाठी स्वतंत्र पाहिजे ही आपली जुनीच मागणी होती, फक्त त्यावर आता अंमलबजावणी झाली आहे. आता स्वतंत्र कार्यालय असल्याने तालुक्‍याच्या पाणी वाटपाला निश्‍चितच फायदा होईल, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. 

कर्जतसाठी कुकडीचे स्वतंत्र कार्यालय होणार आहे. त्यामुळे श्रीगोंद्याचे महत्व कमी होईल अशी शक्‍यता अजिबात नसल्याचे सांगत पाचपुते म्हणाले, की उलट पाणी वाटपाच्या वेळी श्रीगोंद्याला नक्कीच फायदा होणार आहे.

कारण सध्या श्रीगोंदे कार्यालयांतर्गत कर्जत तालुक्‍यातील येसवडी चारी व राशीनचा भाग येत आहे. पाणी वाटपावेळी या चाऱ्याची गणना श्रीगोंद्याच्या हद्दीत होत असल्याने पाणी वाटपाला अडचणी येत होत्या. आता कर्जतसाठी स्वतंत्र कार्यालय होत असल्यामुळे श्रीगोंद्याचा भार कमी होणार आहे.

श्रीगोंदे तालुक्‍याचा काही भाग कुकडी कालवा 70 ते 110 कि. मी. पर्यतचा भाग नारायणगाव कार्यालयाला जोडला आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या काही भागातील शेतकऱ्यांना नारायणगाव कार्यालयाला जाणे अवघड होत आहे. म्हणून हा भागही श्रीगोंदे कार्यालयाला जोडावा अशी मागणी आपण पूर्वीपासूनच केली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT