Indorikar Maharaj case to be heard in court today 
अहिल्यानगर

इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलांची माघार; आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे वकील ॲड. के. डी. धुमाळ यांच्याकडेच सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांच्या भावाचे न्यायप्रविष्ठ प्रकरण आहे. त्यामुळे या संबंधाचा इंदोरीकर महाराजांच्या खटल्यावर परिणाम होऊ शकतो, असा आरोप झाल्याने सरकारी वकील कोल्हे यांनी वकीलपत्र मागे घेतले. आता या खटल्यासाठी सरकारी पक्षाला नवीन वकिल नियुक्त करावा लागणार आहे. या खटल्याची सुनावणी आज (बुधवारी) होणार आहे. 

अपत्य जन्माबाबतच्या वक्तव्यावरून अडचणीत आलेल्या इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध येथील कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला सुरू आहे. या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांची नियुक्ती केली होती. इंदोरीकर यांच्यातर्फे ऍड. धुमाळ, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे ॲड. रंजना गवांदे बाजू मांडत आहेत. 

सरकारी वकील कोल्हे यांच्या भावाविरुद्ध येथील न्यायालयात खटला सुरू असून, त्यांचे वकिल ऍड. धुमाळ आहेत. त्याचा परिणाम इंदोरीकर यांच्या खटल्यावर होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सरकारी वकील कोल्हे यांनी इंदोरीकर महाराजांविरुद्धच्या खटल्यातून स्वत:ला बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला. "व्यक्तीगत चिखलफेक होण्यापेक्षा मला या खटल्याच्या कामात स्वारस्य नसल्याचे ऍड. कोल्हे यांनी सरकारी वकिल कार्यालयास कळविले आहे. या खटल्यासाठी नवीन वकिलांची नियुक्ती करणार आहोत,' असे ॲड. पाटील यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT