Radhakrishna Vikhe Patil esakal
अहिल्यानगर

Radhakrishna Vikhe: पुढाऱ्यांच्या स्टंटबाजीमुळे उद्योग गेले; राधाकृष्ण विखेंनी श्रीरामपूर बंदचा घेतला समाचार

सकाळ डिजिटल टीम

श्रीरामपूर: काहीतरी मिळविण्यासाठी स्टंटबाजी, बंद करण्याची गरज नसते. मात्र, येथील पुढार्यांनी स्टंटबाजी, बंद करून तालुक्याचे उद्योग घालवले. ज्यावेळी मुळा-प्रवरा गेली त्यावेळी बंद करायचे कोणाला आठवले नाही, असा घणाघात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.

एका कार्यक्रमासाठी ते श्रीरामपुरात आले होते. यावेळी शिर्डीला मंजूर झालेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे श्रीरामपुरात बंद पुकारण्यात आल्याचा त्यांनी खरपुस समाचार घेतला.

यावेळी आसाराम ढूस, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, नानासाहेब पवार, शरद नवले, नाना शिंदे, रवी पाटील, भानुदास तांबे, प्रांताधिकारी किरण सावंत आदी उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, की बेलापूरला १२६ कोटीची पाणी योजना दिली. तसेच साडेचार कोटींची शेतीमहामंडळाची जमिन मोफत दिली. यासाठी त्यांना आंदोलन करावे लागले नाही.

नुसत्या राजकीय स्टंटबाजीने आपल्या पुढार्यांनी किती नुकसान केले यावर खरेतर पुस्तक लिहिले पाहिजे. आणि या पुस्तकात माझी मुलाखत छापावी मग मी सांगतो काय इतिहाय व भूगोल आहे ते.

तालुक्यातील राजकीय जुन्या संदर्भांना उजाळा देताना ते म्हणाले, की खासदार बाळासाहेब विखे यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी बेलापूरच्या चौकात कोणीतरी फलक लावला होता की, जर तुम्ही बाळासाहेब विखेंना निवडून दिले तर गावातल्या दहावा, तेराव्यासाठी लोणीच्या पाटावर जावे लागेल.

हे अजून माझ्या स्मरणातून गेलेले नाही. असे असले तरी बेलापूर पाणी योजना व महांडळाची जमीन दिल्याचे त्यांनी स्पष्ट करत कोणालाही कोणाच्या पाटावर जाण्याची गरज नाही. अशोकला दोन-दोन लाख टन ऊस बाहेरच्या कारखान्याला द्यावा लागला.

यासाठी बाहेरून पाणी आले नाही. प्रवरेच्या पाण्यातूनच निर्माण झालेली ही समृद्धी असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याकडे सर्वांचे सातबारे

शेती महामंडळाच्या जमीन वाटपात अनेकांनी घोटाळे केले आहेत. याची माहिती मागवली आहे. तसेच काही डॉक्टरांनी कोरोनामध्ये चांगली कमाई केली. त्यामुळे काहींचे कर्ज फिटले, तर काहींचे दोन दवाखाने झाली.

काहींनी नाशिकला हाॅटेल घेतल्याचे ऐकले आहे, असे सांगत महसुलमंत्री असल्याने आपल्याला सर्वांचा सातबारा ठेवावा लागतो. त्यामुळे तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांचा सातबारा आपल्याकडे आहे, कोणी काय काय उद्योग केले हे एक दिवस सांगू, असाही इशारा मंत्री विखे यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT