shivbhojan thali esakal
अहिल्यानगर

शिवभोजन केंद्रांची तपासणी करा - जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्त सेवा


नेवासे (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील सर्व शिवभोजन (Shivbhojan thali) केंद्रांतील अन्नाचा दर्जा, तसेच थाळी बनविण्यासाठी लागणारे साहित्य खाण्यायोग्य आहे का, याची तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब बाजीराव गायके यांनी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांतून देण्यात येत असलेल्या थाळीतील अन्नाच्या दर्जाबाबत जिल्हा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी व पुरवठा निरीक्षकांनी जिल्ह्यातील काही शिवभोजन केंद्रांची पाहणी केली. त्यात अन्न व औषधे विभागाकडून या अन्नाच्या दर्जाची तपासणी होत नसल्याचे आढळून आले.
त्यानंतर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांतील अन्नाच्या दर्जाबाबत तसेच थाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खाण्यायोग्य आहे का, याची तपासणी नियमित करण्यात यावी व ज्या केंद्रातील अन्नाचा दर्जा तसेच साहित्य नियमानुसार नसल्यास त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत.

''अहमदनगर जिल्ह्यातील शिवभोजनालयांची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून माहितीच्या अधिकाराखाली मागविली होती. त्यात अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने दर महिन्याला या केंद्रांची तपासणी करून प्रमाणपत्र पुरवठा कार्यालयास देणे गरजेचे होते. मात्र तशी कुठलीही तपासणी झालेली असल्याचे आढळून आले. त्यामुळे चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.'' - काकासाहेब गायके, माहिती अधिकार कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT