Investing in gold turned out to be profitable during the Corona period 
अहिल्यानगर

सोन्यातील गुंतवणूक कशी ठरली फायदेशीर.. तुम्हीच पाहा

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : शेअर्स, मॅच्युअल फंड व इतर क्षेत्रातील गुंतवणूकीपेक्षा कमी कालावधीत सोन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचे दिसत आहे. कोरोनासारख्या कठीण काळात सर्वसामान्यांना सोनेच पैसा देऊन गेल्याची माहिती येथील सोन्याचे व्यापारी व विसपुते सराफ पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली. 

ते म्हणाले, की संपूर्ण जगासह देशात कोविड-19 आजाराने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत देश लॉकडाऊन झाला. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. अनेकांना नोकरी गमवावी लागली. लोकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. जागतिक बाजारपेठ कोसळल्यामुळे शेअर्स, म्युच्युअल फंड यांच्यातील गुंतवणुकीमध्येही मोठा फटका बसून, अनेकांचे नुकसान झाले. 

मागील काही वर्षांत पीएमसी बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, अनेक सहकारी बॅंका व पतसंस्था, यांमध्ये झालेली काही प्रकरणे, ठेवीवरील कमी होत चाललेला व्याजदर, यांमुळे बॅंकांमधील पैशाही किती प्रमाणात परतावा देऊ शकतो, याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात शंका उत्पन्न होत आहे. 

सोन्यातून सर्वाधिक परतावा 

विसपुते म्हणाले, की अशा परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक भारतीय लोकांना नेहमी खात्री देणारी वाटते. हे मागील 50 वर्षांतील सोन्यातून मिळालेल्या परताव्याने सिद्ध झाले आहे. अगदी अलिकडच्या काळाचा विचार जरी केला, तरी 2005 मध्ये सोन्याचा भाव पाच हजार रुपये प्रति तोळा होता. तो केवळ 15 वर्षांत 50 हजार रुपये प्रति तोळा झाला. म्हणजे 15 वर्षांत 10 पटीने परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. ज्या लोकांनी सोन्यात गुंतवणूक केली, अशा लोकांना आज कोरोनाच्या कठिण काळात हातातील सोने मोडून तातडीने बऱ्यापैकी पैसा हाती येत आहे. तो उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडत आहे. 

आजही सोन्यातील गुंतवणूक फायद्याची 

आजही आपण सोन्यात गुंतवणूक केली, तरी पुढील काही वर्षांनी येणाऱ्या संकटांना आपण निश्‍चित सामोरे जाऊ शकतो. कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतविणे व त्यातून किती परतावा मिळतो, हेदेखील पाहणे आवश्‍यक आहे, असे मत विसपुते सराफ पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टाइगर श्रॉफच्या शूटिंग प्रकरणात मोठी अपडेट! टीव्ही न्यूजच्या आधारे शूटर्सना मास्टरमाइंडच्या सूचना, ११ जणांना अटक

Loan Waive: शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा साडेआठ हजार जणांची यादी जाहीर; आतापर्यंत ५२ हजार १८४ शेतकरी पात्र

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

'एक होती चिऊ एक होता काऊ...' डॉ. नेनेंसाठी हे सातारी शैलीत माधुरीचा हटके उखाणा, Video पाहून नेटकरी म्हणाले...

Water Protest: दरवाजे उघडू ;राजू शेट्टी यांचा इशारा ;भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात सर्वपक्षीय आंदोलन

SCROLL FOR NEXT