rohit pawar esakal
अहिल्यानगर

कर्जत-जामखेडमधील विहिरीखोदाईचा प्रश्न सुटला; मोठी अडचण दूर

वसंत सानप

जामखेड (जि.अहमदनगर) : कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यांना पाणीदार बनवण्यासाठी आमदार रोहित पवार अनेक प्रभावी योजना हाती घेत आहेत. दुष्काळी गावे टँकरमुक्त व्हावीत, तसेच पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही तालुक्यांतील सिंचन विहिरींच्या खोदाईसाठी येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार रोहित पवारांनी भूजल सर्वेक्षण विकास व यंत्रणा विभागाचे राज्याचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची नुकतीच भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, २०२०-२१ अंतर्गत कर्जत-जामखेडकरिता सिंचन विहिरी खोदाईसाठीच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या व सकारात्मक बदल केले. त्यामुळे मोठी अडचण दूर झाली आहे.

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश

भूजल सर्वेक्षण विभागाने कर्जत व जामखेड तालुक्यांत केलेल्या सर्वेक्षणानुसार व सिंचन विहिरी घेण्याबाबत बदललेल्या कार्यपद्धतीमुळे मतदारसंघातील खूप कमी गावे सिंचन विहीर योजनांसाठी पात्र होती. त्यामुळे उर्वरित गावांतील लाभार्थी सिंचन विहीर खोदाई योजनांपासून वंचित राहिले होते. आमदार पवार यांनी याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक कलशेट्टी यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून पाठपुरावा केला आणि त्याला यशही आले आहे.

शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवारांचे कौतुक

आमदार पवार व कलशेट्टी यांच्यासमक्ष झालेल्या चर्चेत सिंचन विहिरी खोदण्याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडून अवलंबिण्यात येत असलेली कार्यपद्धती काही अंशी बदलण्यात येत असल्याने, कर्जत-जामखेड मतदारसंघातील, तसेच नगर जिल्ह्यातील इतर अतिरिक्त गावांचाही समावेश या योजनेमध्ये होत आहे. त्यामुळे आता या उर्वरित गावांतील लाभार्थींनाही सिंचन विहिरी खोदाईच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. कर्जतमधील एकूण ६२ गावे व जामखेडमधील ८७ गावे या योजनांसाठी पात्र असणार आहेत. या भेटीत कर्जत तालुक्यातील अटल जल योजनेत समाविष्ट गावांमध्ये योजना लवकरात लवकर सुरू करावी व यामध्ये जामखेडमधील गावांचाही समावेश करावा, ही चर्चाही करण्यात आली. त्यामुळे कर्जत-जामखेड आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या गावांना आता सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही. शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवारांचे कौतुक होत आहे.

एकाच दगडात अनेक पक्षी!

आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न पाठपुरावा करून सोडवत असताना, त्याचा फायदा मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यालाही होतो. पीकविमा, बियाणे, तसेच अन्य प्रश्नांसोबत आता सिंचन विहिरी खोदाईचा जिल्ह्यातीलही प्रश्न मार्गी लागत आहे. याबाबत नवीन आदेश संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना लवकरच देण्यात येणार आहेत. आमदार पवारांचे काम मतदारसंघापुरते मर्यादित न राहता ते अनेकांच्या कामी येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT