It is time to hold election meetings of sugar factories in Shrigonda online 
अहिल्यानगर

श्रीगोंदयात साखर कारखान्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या वार्षिक सभा ऑनलाईन घेण्याची नामुष्की

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्यातील नागवडे व कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या दरवर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभा जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपाने गाजतात. त्यातच या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका काही महिन्यात होत आहेत.  त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठी ही एक वेगळी पर्वणी असते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सभा आता ऑनलाईन घेण्याची वेळ आली आहे.
 
तालुक्यातील शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखानाच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. या दोन्ही कारखान्यांची संचालकांची मुदत गेल्यावर्षी संपली आहे. कोरोना संकटात सगळ्याच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने या दोन्ही कारखान्याच्या सत्ताधारी मंडळाला वाढीव मुदत मिळाली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच दोन वेळेस सहकारी संस्थांच्या निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने पुढे ढकलण्यात आल्या.

दरम्यान या दोन्ही कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक असल्याने निवडणुकीपूर्वी या सभा झाल्यास सत्ताधारी मंडळाला दराबाबत गुडन्यूज देण्याची संधी साधता येते. तर विरोधकांना गेल्या पाच वर्षातील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर बोट ठेवून सभासदांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र या दोन्ही कारखान्याच्या सर्वसाधारण सभा लोकांच्या अथवा सभासदांच्या उपस्थितीत होणार नाहीत. आता कारखान्यांच्या या सभा घरबसल्या सभासदांना पहावयास मिळणार आहेत. त्यांना घरूनच ऑनलाइन या सभेत सहभागी होता येणार आहे.

नागवडे कारखान्याचे कार्यकारी आधी संचालक रमाकांत नाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की नागवडे कारखान्याची ऑनलाईन सर्वसाधारण सभा २५ मार्च रोजी होत आहे. त्यासाठी कारखान्याने पूर्ण तयारी केली असून झूम ऍपद्वारे सभासदांना त्यात सहभागी होता येणार आहे. नेहमीप्रमाणे कारखान्याच्या संदर्भातले एक विषय घेतले जाणार असून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या परवानगीने ऐन वेळेच्या विषयातही सभासदांना सहभागी होता येणार आहे. यात जास्तीत जास्त सभासदांनी सहभागी होऊन आपली मते मांडावीत व कारखान्याचा कारभार समजून घ्यावा असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT