It is unknown at this time what he will do after leaving the post 
अहिल्यानगर

सावधान रहा, कोण कशी लूटमार करील याचा नेम नाही

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरातील सक्कर चौकातून स्टेशन रस्त्याकडे वळताना दुचाकीस्वारांचा अपघात झाला. तेथे जमलेल्यांपैकी दोघांनी, जखमी दुचाकीस्वाराचे नातेवाईक असल्याचे सांगून लुबाडले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पांडुरंग शहाजी गायकवाड (रा. गवळीवाडा, रेल्वेस्थानक रस्ता) यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता पांडुरंग गायकवाड दुचाकीवरून सक्कर चौकातून रेल्वेस्थानक रस्त्याने जात असताना, दुचाकी खडीवरून घसरून पडले.

चक्कर आल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्या वेळी अपघातस्थळी जमलेल्या व्यक्तींपैकी दोघांनी अन्य उपस्थितांना, जखमी व्यक्तीचे नातेवाईक असल्याचे, तसेच त्यांना दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, असे सांगितले.

त्यांनी गायकवाड यांना दुचाकीवर बसवून रेल्वेस्थानकाकडे नेऊन, लक्ष्मी मंदिरासमोर उतरवून दिले आणि त्यांना काही कळण्याच्या आत दुचाकी व मोबाईल घेऊन दोघांनी पोबारा केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: १४ व्या वर्षीच वैभवनं युवराज, रैनाचा विक्रम तर मोडलाच, आता लक्ष्य या विश्वविक्रमावर

Crime News : नाशिकमध्ये सायबर भामट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ नागरिकांचा मोबाईल गहाळ करून ४ लाखांची लूट

Video : सावधान! तुम्ही कचरा तर खात नाही ना? हॉटेलमध्ये शिजत असलेल्या जेवणात कचरा टाकल्याचा किळसवाणा व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Updates : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Budh Gochar 2025: बुध ग्रहाची वक्री गती, मिथून राशीसह 'या' 5 राशींना येतील पैशाबाबत अडचणी

SCROLL FOR NEXT