It is wrong to give planning board funds to MLAs, criticizes Harshda Kakade 
अहिल्यानगर

नियोजन मंडळाचा निधी आमदारांना देणे चुकीचे, हर्षदा काकडेंची टीका 

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : ग्रामीण भागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना नियोजन मंडळातून मिळणारा निधी आमदारांना दिला. हा निर्णय जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांस धक्का लावणारा आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी व्यक्त केले. 

पत्रकात काकडे यांनी म्हटले आहे, की जिल्हा परिषदेत विविध पक्षांचे, गटांचे 73 सदस्य असले, तरी ते सुमारे 40 हजार लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. आधीच जिल्हा परिषदेचा बहुतांश निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जातो. ग्रामीण भागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मिळणारा नियोजन मंडळाचा हक्काचा निधीही इतरत्र वळविला, तर जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामे करण्यासाठी निधीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात जिल्हा परिषद सदस्यांबद्दल नाराजी निर्माण होणार आहे. 

आमदारांना स्वतःचा निधी आहे व अन्य माध्यमातूनही त्यांना कामे करता येतात. मात्र, जिल्हा परिषद सदस्यांना निधीबाबत फार मर्यादा आहेत. नियोजन मंडळाचा निधी आमदारांना दिला, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अस्तित्वापुढेच प्रश्न निर्माण होणार आहे. या निर्णयामुळे सर्व जिल्हा परिषद सदस्यांमध्ये अस्वस्थता आहे. वास्तविक, जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे काम जिल्हा परिषद अध्यक्षांचे आहे. अध्यक्षांनी या विषयावर खंबीर भूमिका घेणे गरजेचे होते. या बाबत पुढाकार घेऊन अध्यक्षांनी सदस्यांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी काकडे यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT