Jamkhed will be in the top ten in the clean survey competition
Jamkhed will be in the top ten in the clean survey competition 
अहमदनगर

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत जामखेड टॉप टेनमध्ये

वसंत सानप

जामखेड : ""संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा होत असून, विविध गटांत होणाऱ्या स्पर्धेत जामखेडला पहिल्या 10 क्रमांकांत स्थान मिळेल असे काम करू. जामखेडची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,'' असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या तयारीसाठी पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच समन्वय समितीची बैठक झाली. "गारबेज क्‍लीन'चे संचालक प्रवीण नायक, भूषण देशमुख, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, प्रा. मधुकर राळेभात, प्रा. राजेंद्र पवार, सुरेश भोसले, रमेश आजबे आदी उपस्थित होते. 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी सर्व पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, व्यापारी संघटना, तसेच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन करीत पवार यांनी स्पर्धेची नामांकने, त्याचे निकष व स्पर्धेत घ्यायची काळजी, अशा विविध बाबींची माहिती दिली. स्वच्छता सर्वेक्षण लोकचळवळ झाली पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

मुख्याधिकारी दंडवते यांनी, काही दिवसांतच जामखेडचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT