Tractor Rally sakal
अहिल्यानगर

Tractor Rally : नगरमध्ये जनआक्रोश आंदोलन! दूध दरवाढीसाठी ट्रॅक्टर मोर्चा

कांद्याचे कोसळलेले भाव, दूध दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जनआक्रोश आंदोलन.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - दुधाला ४० रुपये व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे २५ ट्रॅक्टर चालक सहभागी झाले होते. खासदार नीलेश लंके यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

कांद्याचे कोसळलेले भाव, दूध दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून (ता.५) शेतकरी जनआक्रोश आंदोलन पुकारले आहे. शासनाने दुधाला ४० रुपये हमीभाव द्यावा, अशी प्रमुख मागणी आहे. राज्य शासन आणि दुग्धविकास मंत्री यांच्या दुर्लक्षामुळे हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. सहभागी शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच त्यांनी जनावरे बांधली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून सायंकाळी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन आंदोलकांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला.

गुलमोहर रस्त्याने निघालेल्या या मोर्चाचा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चाचा समारोप झाला. शेतकरी व आंदोलनकर्ते गळ्यात कांद्याच्या माळा घालून मोर्चात सहभागी झाले.

राजकीय नेत्यांचा आंदोलनाला पाठिंबा

आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या आंदोलनास त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT