NCP Jayant Patil esakal
अहिल्यानगर

Jayant Patil: शरद पवारांचा पुन्हा झंझावात दिसेल, जयंत पाटील यांचे उद्गार

सर्वांना आपल्यासोबत घेऊन सरकार आणता येईल, असे त्यांना वाटते. परंतु शरद पवार यांचा झंझावात कायम आहे, तो या निवडणुकीतही दिसेल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ डिजिटल टीम

Jayant Patil on Sharad Pawar: भाजपने खोटी आश्वासने देऊन लोकांना फसवण्याचे काम केले. आता दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडण्याचा उद्योग सुरू आहे. लोकप्रतिनिधींवर दबाव आणला जातो, हे सर्व लोकांना माहिती आहे. सर्वांना आपल्यासोबत घेऊन सरकार आणता येईल, असे त्यांना वाटते. परंतु शरद पवार यांचा झंझावात कायम आहे, तो या निवडणुकीतही दिसेल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात पाटील बोलत होते. पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी आक्रमकपणे लढण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांची बैठक घेतली आहे. पक्षाची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत पोहोचवा. सर्वांनी एकदिलाने लढा दिला, तर यश आपलेच आहे.

सर्व घटकपक्षांसोबत बोलणी सुरू आहे. जेथे आपली ताकद आहे, तेथील जागा लढविल्या जातील. जेथे आपला उमेदवार नाही, तेथील जागाही निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा. ज्या मतदारसंघात माणूस नाही, तेथे नवा माणूस उभा केला जाईल. (Latest Marathi News)

प्राजक्त तनपुरे यांचे कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर हे पहिलेच शिबिर शिर्डीत पार पडले. आज या शिबिराचा समारोप झाला. या शिबिरासाठी राज्यातून तब्बल दीड हजाराहून अधिक पदाधिकारी उपस्थित होते. पक्षातील आमदार, खासदारांचीही उपस्थिती होती. या शिबिराचे नेटके नियोजन केल्याने राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे जयंत पाटील यांनी कौतुक केले. आभार जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मानले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT