In Karjat, 28 out of 50 prisoners tested positive for corona 
अहिल्यानगर

कर्जतमध्ये ५० पैकी २८ कैदी कोरोना बाधित, प्रशासनाची धावपळ

नीलेश दिवटे

कर्जत : तालुक्यात न्यायालयीन व पोलिस कस्टडीत असलेल्या पन्नास कैद्यापैकी अठ्ठावीस कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या प्रकारामुळे तहसील परिसरात खळबळ उडाली आहे.

कैदी बाधित सापडल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. येथील उपकारागृहामध्ये एकूण एकोण पन्नासजण आहेत. यामध्ये अठ्ठे चाळीस पुरुष तर एक महिला आहे. या पैकी न्यायालयीन कोठडीत बेचाळीस आरोपी आहेत तर सात आरोपी पोलिस कस्टडीत आहेत.

आज या सर्व आरोपींची कोरोनाची अँटीजेनिक टेस्ट करण्यात आली. यामध्ये अठ्ठावीस कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. या बाबत तहसीलदार नानासाहेब आगळे यांना अहवाल पाठविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे.

पुढील आदेशाप्रमाणे या आरोपींना कोठे ठेवायचे याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. कर्जत येथील उपकरागृहात चार बराकी आहेत. या पैकी एका बराकीत महिला आरोपी आहे. तर एका बराकीमध्ये पोलिसांवर हल्ला करणारा माथेफिरू आहे. त्यामुळे उर्वरित दोन बराकीत सर्व आरोपी ठेवण्यात आले होते. त्यांची तर इतरत्र व्यवस्था करण्यात येणे आवश्यक आहे. 

येथील कोठडीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याचे समजताच नगर पंचायतीने हा सर्व परिसर औषध फवारणी करून निर्जंतुक करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते
 

आज येथील उपकारागृहातील सर्व कैद्यांची कोरोना तपासणी केली तीत अठ्ठावीस पॉझिटिव्ह आले असून त्यांना तातडीने नगर येथे हलविण्यात आले आहे

- नानासाहेब आगळे,तहसीलदार, कर्जत.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT