NCP sakal
अहिल्यानगर

कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगची इनिंग

कर्जत-जामखेडमध्ये भाजपमधून आऊटगोइंग सुरू

वसंत सानप

जामखेड : कर्जत-जामखेडमध्ये भाजपमधून आऊटगोइंग सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंगची इनिंग सुरू आहे. अशातच जामखेड येथील डॉ. अरुण जाधव यांनीही वंचित बहुजन आघाडीत शहरातील तरुण कार्यकर्त्यांना शुक्रवारी पक्षप्रवेश देऊन पक्षसंघटना मजबूत करीत नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढून नगरपालिकेवर वंचितचा झेंडा फडकविणार असल्याचा दावा केला.
प्रदेशावरूनही डॉ. जाधव यांच्या भूमिकेला पक्षप्रमुखांचे बळ असल्याची पुष्टी पक्षनिरीक्षक रामभाऊ मरगळ यांनी स्पष्ट केली. जामखेड येथे वंचित बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवार (ता. १७) रोजी पार पडली. या वेळी पक्षनिरीक्षक रामभाऊ मरगळ, राज्य समन्वय डॉ. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रतीक बारसे, जिल्हा सचिव योगेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव चव्हाण, ज्येष्ठ सल्लागार जीवन पारधे, जिल्हा महासचिव योगेश साठे, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष आतिष पारवे उपस्थित होते.

या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जामखेड शहरातील सुधीर कदम, रवींद्र जाधव, जय ओम टेकाळे, मोहन शिंदे, विष्णू चव्हाण, सागर ससाणे, तान्हाजी चव्हाण, राजू सावंत, सागर शिंदे, अविनाश जाधव, आकाश शेगर, डॉ. शेख खलिल तय्यब, किशोर देडे, सोहेल मदारी, जावेद मदारी, अल्ताफ मदारी आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारला पाईक होऊन सर्व वंचित घटकातील सर्व जाती जमातीतील माणसांनी एकत्र येऊन जामखेड नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवायचा आहे.
- रामभाऊ मरगळ, पक्षनिरीक्षक, वंचित बहुजन विकास आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT