Keep the biometric off in the ration shop 
अहिल्यानगर

अंगठा टेकवल्यावरच मिळते धान्य..  बायोमॅट्रीकला नको सध्या प्राधान्य..! 

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून लाभार्थींची बायोमॅट्रीक पडताळणी बंद ठेवून धान्यवाटप करण्याचा सरकारचा आदेश आहे. परंतु, रेशन दुकानात आज लाभार्थींना बायोमॅट्रीक पडताळणीनंतरच धान्य मिळत होते. बायोमॅट्रीक पडताळणीमुळे रेशन दुकानातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ही बायोमॅट्रिक बंदच ठेवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. बाधीत रुग्णाचा शोध घेऊन त्याच्यासह त्याच्या संपर्कातील लोकांचे प्रशासन तत्काळ विलगीकरण करते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारने प्रथम रेशन दुकानातून नागरिकांची बायोमॅट्रीक पडताळणी बंद करुन धान्यवाटपाचा आदेश दिला होता. तीन मेपर्यंत केलेले लॉकडाउन संपल्याने, तसेच या आदेशाला मुदतवाढ न मिळाल्याने, आजपासून लाभार्थींना बायोमॅट्रीक पडताळणी केल्यावरच धान्य मिळत आहे. 

सोशल डिस्टन्सचा फज्जा

पॉस मशीनवर अंगठा लावल्याशिवाय लाभार्थींना धान्य मिळत नाही. त्यामुळे रेशन दुकानातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे मत दुकानदारांनीही व्यक्त केले. बायोमॅट्रीक पद्धतीने धान्यवाटप करताना, दुकानात सोशल डिस्टन्स राखणे अवघड होत आहे. बायोमॅट्रीक पद्धतीने धान्यवाटप करण्यासाठी दुकानदारालाच लाभार्थीचा अंगठा पॉस मशीनवर ठेवावा लागतो. त्यातून रेशन दुकानदार व लाभार्थींमध्ये शारीरिक अंतर ठेवता येत नाही. 

जुन्या आदेशाला मुदतवाढीची मागणी

गेला महिनाभर लाभार्थींचे आधारकार्ड पाहुन धान्यवाटप करण्यात आले. मात्र, आता बायोमॅट्रीक पद्धतीने लाभार्थींना धान्यवाटप करावे लागत असल्याने दुकानदारांसह नागरिकांनीही नाराजी दर्शविली. शासनाने जुन्या आदेशाला मुदतवाढ देऊन बायोमॅट्रीक पडताळणी सध्या तरी बंदच ठेवावी, अशी मागणी तालुक्‍यातील रेशन दुकानदारांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

MBA: नफा आणि निसर्ग दोन्ही महत्त्वाचे! MBA मध्ये 'कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी' आणि 'ग्रीन फायनान्स' या नव्या विषयांना मोठी मागणी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Radhanagari Dam : राधानगरी धरण सेवाद्वार नूतनीकरणासाठी ८८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

Bilimora Waghai Railway: १०० वर्षांची ‘मिनी ट्रेन’ आजही धावते; बिलीमोरा-वाघई रेल्वे आदिवासींची जीवनवाहिनी

SCROLL FOR NEXT