निघोज : दारू एक ग्लास दुश्मनालाही सोबत आणू शकतो आणि दोस्तालाही दुश्मन बनू शकतो. पारनेर तालुक्यात झालंही तसंच. एका दारूच्या ग्लासाने दोस्त दुश्मन बनले. आणि त्याचा जीव घेऊनच शांत झाले.
जवळा ( ता.पारनेर) येथील हे तिघे मित्र दारु पिण्यासाठी शिरूर तालुक्यात गेले होते. या बाबत माहिती अशी , एकनाथ दत्तात्रय जाधव (३७,) वामन विठ्ठल खुपटे वय (४०), आप्पा उर्फ रोहित शिवाजी गवळी ( २३, सर्व राहणार जवळा, पारनेर जि अहमदनगर) येथून हे तिघे मित्र २५ जून रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास आप्पा गवळी याच्याकडील मोटारसायकलवर (क्रमांक एम एच-१२ -१८८) बसून मलठण (तालुका शिरूर जिल्हा पुणे) येथे गेले होते.
ते नेहमी एकत्रित कामासाठी या परिसरात येत जातात. त्यांना दारूचे, गांजाचे व्यसन आहे. २५ जून रोजी दुपारी २:३०वाजेच्या सुमारास आमदाबाद शिरूर जिल्हा पुणे येथे एका मंदिरामागे त्यांनी एकत्रित बसून दारूची पार्टी केली. त्यानंतर त्यांच्यात त्याच ठिकाणी किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या भांडणानंतर वामन विठ्ठल खुपटे आणि आप्पा उर्फ रोहित गवळी यांनी मिळून एकनाथ जाधव यास मारहाण केली. त्याला ठिबक संचाच्या नळीने गळा आवळून खून करून ठार मारले. आमदाबाद रोडवरील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या नाल्यातील पाण्यात फेकून देऊन पसार झाले. त्यानंतर एकनाथ जाधव हा घरी कसा येईना म्हणून त्याचा भाऊ अनिल जाधव व त्याच्या कुटुंबाने त्याची शोधाशोध सुरू केली.
आरोपी वामन खुपटे हा गावात फिरताना त्यांना भेटला. त्याच्याकडे नातेवाईक व ग्रामस्थांनी कसून चौकशी करता तो एकनाथविषयी दिशाभूल करीत असल्याचे समोर आलं. कधी त्याचा गळा आवळून खून केल्याचेही कबुली द्यायचा.
पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गवळी यांना माहिती समजताच पोलिसांनी वामन खुपटे यास घेवुन घटनास्थळी रात्री उशिरा नेले. तेथील ओढ्याच्या नाल्यात एकनाथ याचा मृतदेह आढळून आला. पारनेर पोलिसांनी शिरुर पोलिसांना याबाबत माहीती कळवताच शिरुर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. शिरुर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.