In Kopargaon four establishments violating the rules have been sealed  
अहिल्यानगर

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार आस्थापना 'सील'

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव (अहमदनगर) : कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार आस्थापनांना तहसीलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या पथकाने 'सील' केले. यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचे संकेत तहसीलदारांनी दिले आहेत. 

कोविडचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना, हॉटेल व अन्य व्यावसायिकांची दुकाने 'सील' करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोपरगाव भेटीदरम्यान स्थानिक जबाबदार अधिकाऱ्यांना दिले. आठवड्यापासून प्रशासनातर्फे नागरिक, व्यापाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या. मात्र, काही दुकानांमध्ये मोठी गर्दी होऊन, कोविड नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत होते. अखेर महसूल, पोलिस व पालिकेतर्फे शहरातील आस्थापनांची पाहणी करण्यात आली.

इलेक्‍ट्रिक वस्तूंचे दुकान, बेकरी, हॉटेल अशा प्रत्येकी एका व्यावसायिकावर कारवाई करण्यात येऊन चार आस्थापनांना 'सील' ठोकण्यात आले. कोणावर हेतुपुरस्सर कारवाईचा शासनाचा उद्देश नाही; मात्र नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे, असे तहसीलदार चंद्रे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT